सेंट पीटर

पोप सेंट पीटर
जन्म नाव सिमॉन
पोप पदाची सुरवात इ.स. ३०
पोप पदाचा अंत इ.स. ६४
मागील पहिला पोप
पुढील पोप लायनस
मृत्यू इ.स. ६७
रोम
यादी
पीटर पॉल रुबेन्सने कल्पलेले सेंट पीटरचे चित्र

सिमॉन पीटर हा एक प्राचीन ख्रिश्चन पुढारी व येशू ख्रिस्ताच्या १२ प्रचारकांपैकी एक प्रचारक (Apostle) होता. बायबलच्या नव्या करारामध्ये पीटरला संताचे स्थान दिले गेले आहे. पीटरचा जन्म अंदाजे इ.स.पू. १ मध्ये गॅलिलीच्या (आजचा इस्रायल) बेथसैडा ह्या गावात झाला. पीटरचा भाऊ सेंट अँड्र्यू हा देखील येशूच्या १२ प्रचारकांमध्ये होता.

अनेक ख्रिश्चन पुढाऱ्यांच्या मते पीटर जगातील पहिला पोप मानला जातो. पीटरने ख्रिश्चन धर्माचा प्रचार करताना अनेक पुस्तके लिहिली, अंदाजे इ.स. ६७ मध्ये रोमन सम्राट नीरो ह्याच्या हुकुमावरून रोममध्ये पीटरला ठार मारण्यात आले. त्याचे अवशेष व्हॅटिकन सिटीमधील बासिलिका ऑफ सेंट पीटरमधील एका थडग्यात आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!