श्रीधर महादेव जोशी


श्रीधर महादेव जोशी
टोपणनाव: एसएम जोशी
जन्म: नोव्हेंबर १२, इ.स. १९०४
मृत्यू: एप्रिल १, इ.स. १९८९
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा, समाजवाद


श्रीधर महादेव जोशी, अर्थात एस.एम. जोशी, (जन्म : १२ नोव्हेंबर १९०४; मृत्य : १ एप्रिल १९८९) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील निःस्वार्थीपणे अन्‌ अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास’ बनून गेले असे ते समाजवादी लढवय्ये असून मवाळ वृत्तीचे एक नेते होते. एसएम जोशींचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वार्थाकडे दुर्लक्ष करून, देशार्थासाठी कार्यरत राहणे एसएम जोशींनी चालूच ठेवले. १९५७ साली ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार झाले आणि १९६७ साली ते २ऱ्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून गेले.

घरात दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असताना आणि स्वतःचेच दुःख डोंगराएवढे असतानाही देशहिताच्या गोष्टी करण्याची इच्छा त्यांना लहानपणापासूनच होती. जो दुबळा आहे त्याच्या बाजूने आपल्या तत्त्वांची ताकद उभा करणारा हा लढवय्या अगदी लहानपणापासून लोकहितदक्ष असे.

देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपापल्या परीने आणि मार्गाने प्रत्येक जण लढत होता. जहाल – मवाळांच्या अखंड प्रयत्नातून आशेचा किरण सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत होता. हे प्रयत्न, राष्ट्रभक्तीचे वातावरण या सर्वांविषयी एस.एम. यांना विलक्षण ओढ होती.

एसएम जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सक्रिय सभासद होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत आणि त्यानिमित्त झालेल्या प्रत्येक सार्वजनिक सभेत एसएम यांची हजेरी असे.

प्रकाशित साहित्य

  • नेताजींचे सीमोल्लंघन
  • मी एस् एम् (आत्मचरित्र)

एसएम जोशींवरील पुस्तके

  • लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ (डाॅ. वासंती रासम आणि डाॅ. करिअप्पा खापरे)

स्मारके

  • एस. एम. जोशी हिंदी शाळा, पुणे.
  • एस. एम. जोशी काॅलेज, हडपसर (पुणे)
  • एस. एम. जोशी सभागृह, पुणे
  • एस. एम. जोशी अध्यापक विद्यालय, नाशिक

बाह्य दुवे

https://www.marathisrushti.com/articles/s-m-joshi/

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!