बौद्धाचार्य शांतिस्वरूप बौद्ध (२ ऑक्टोबर १९४९ - ६ जून २०२०) एक भारतीय लेखक, बौद्ध विद्वान, चित्रकार, प्रकाशक आणि पाली भाषा तज्ज्ञ होते.[१][२] त्यांचा जन्म १९४८ मध्ये एका जाटव दलित कुटुंबात दिल्ली येथे झाला.[३][४] इ.स. १९७५ मध्ये त्यांनी आंबेडकरी, बहुजन, नवयान बौद्ध, पाली साहित्य आणि दलित साहित्य यांना समर्पित सम्यक प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन केली.[५] सम्यक प्रकाशनाने २०००हून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून त्यातील अनेक इंग्रजी, सिंहली, नेपाळी, बर्मी यासह १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत.[६] ते धम्म दर्पण आणि दलित दस्तक मासिकांचे संपादक मंडळात होते.[७] ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते.[८]
जीवन व कारकीर्द
त्यांचे "शांतिस्वरूप" हे नाव स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले होते.[९] शांतिस्वरूप बौद्ध यांचे आजोबा चौधरी देवीदास यांचा डॉ. आंबेडकर यांच्यासोबत १९४२ पासूनच संबंध होता. शांतिस्वरूप यांचा २ ऑक्टोबर १९४९ जन्म झाला, तेव्हा त्यांचे नाव गुलाबसिंग ठेवले गेले. चौधरी देवीदासांनी ४ ऑक्टोबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांना नातू झाल्याची बातमी सांगितली व गुलाबसिंग नाव ठेवण्यात आल्याचेेेही सांगितले. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की, "आजच्या पेपरात एका मोठ्या वैज्ञानिकाचे नाव छापून आले आहे – शांतिस्वरूप भटनागर! फार सुंदर नाव आहे. मुलांचे नाव ‘शांतिस्वरूप’ ठेवा आणि भटनागर शब्दाला गुलाबसिंग शब्दासोबत फेकून द्या!" बाबासाहेबांनी सुचविल्यानुसार चौधरीजींनी आपल्या नातवाचे ‘गुलाबसिंग’ हे नाव बदलून ‘शांतिस्वरूप’ हे नाव ठेवले. डॉ. आंबेडकरांनी बुद्धधम्माची दीक्षा घेतल्यानंतर शांतिस्वरूप सुद्धा बौद्ध झाले व त्यांनी 'बौद्ध' नाव हे आडनाव म्हणून स्वीकारले.[१०]
शांतिस्वरूप बौद्ध यांना आंबेडकरी चळवळीचा वारसा त्यांचे आजोबा चौधरी देवीदास आणि वडील लाला हरीचंद मौर्य यांच्याकडून लाभला होता. त्यांचे वडील लाला हरीचंद्र मौर्य हे आंबेडकरी आंदोलनात होते.[९] त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा संबंध आंबेडकरी चळवळीशी होता. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्धधम्म आणि सामाजिक विषयांवर लेखन केले.[१०]
१९६४ च्या देशव्यापी भूमीहिन सत्याग्रहाच्या आंदोलनात विद्यार्थी शांतिस्वरूप यांचा सहभाग होता. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते भारतीय रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाले. दिल्ली प्रदेशच्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते १९७० पासूनच सक्रिय होते. इ.स. १९७१ ते ते १९७३ पर्यंत ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष होते. दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचा विकास करण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.[९] सरकारची राजपत्रित अधिकारी पदाची नोकरी सोडून डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे त्यांनी ठरविले.[१०]
निधन
६ जून २०२० रोजी दिल्ली येथील राजीव गांधी सुपर स्पेशॅयालिटी हॉस्पिटल मध्ये शांतिस्वरूप बौद्ध यांचे निधन झाले.[९]
लेखन
हिंदी भाषेत त्यांनी ७५ पुस्तकांचे लेखन केले. इंग्रजीत भाषेत त्यांची ४३ पुस्तके आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद मराठी, पंजाबी, बर्मी इ. भाषांमध्ये झालेला आहे.[१०]
- मांग-मातंग जाती के आदि पुरुष:कोसलराज पसेनदि (२०१८)
- महाराजा जयचंद गद्दार नही, परम देशभक्त बौद्धराजा थे (२०१६)[१०]
- धम्मपद गाथा और कथा[११]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर की संघर्ष यात्रा और संदेश[१२]
- गॉडेस इंग्लिश चित्रकला[१३]
बाह्य दुवे
संदर्भ