वॉटर पाईप रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील माथेरान डोंगरी रेल्वे या अरुंदमापी लोहमार्गावरील एक स्थानक आहे. नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबा घेतात.
हे स्थानक एक 'तांत्रिक थांबा' असून येथे तिकीट खिडकी नाही. या स्थानकापासूनचे किंवा या स्थानकापर्यंतचे तिकीट उपलब्ध होत नाही.
पूर्वीच्या काळी जेव्हा नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणा-या गाड्या वाफेच्या इंजिनावर धावायच्या तेव्हा या स्थानकात इंजिनात पाणी भरले जायचे. आजही येथे ती पाण्याची टाकी व नळ दिसतो.