वामन तावडे


वामन तावडे (जन्म : इ.. १९५०; - ७ मे २०१९) हे एक मराठी नाटककार होते. वास्तववादी नाटककार व एकांकिकाकार अशी त्यांची प्रसिद्धी होती. ते समाजवादी विचारांचे आणि गंभीर प्रवृत्तीचे लेखक होते.

वामन तावडे हे आधी मुंबईच्या स्टँडर्ड अल्कली कंपनीमध्ये कामगार होते. तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांची नाटके सातत्याने वेगळ्या सामाजिक विषयावर व मानवी नातेसंबंधविषयक असत. कामगारवर्गामधून पुढे आल्याने त्यांना कामगार वर्गातील प्रश्नांची जाणीव होती.

वामन तावडे यांची नाटके आणि एकांकिका

  • इमला
  • कॅम्पस
  • कन्स्ट्रक्शन (एकांकिका)
  • चौकोन
  • छिन्न (हे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेमध्ये गाजल्यानंतर ते व्यावसायिक स्वरूपात रंगभूमीवर आले. या नाटकात सदाशिव अमरापूरकर, आशालता वाबगांवकर, दिलीप कुलकर्णी, स्मिता पाटील अशा दिग्गज कलावंतांनी भूमिका केल्या होत्या.
  • तुम्ही आम्ही
  • नादखुळा (ऎकांकिका)
  • पिदी (एकांकिका)
  • मी घोडा हुसेनच्या चित्रातला (एकांकिका)
  • रज्जू
  • रायाची रापी (एकांकिका)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!