राहुलदेव बर्मन उर्फ आर. डी. बर्मन (२७ जून इ.स. १९३९ - ४ जानेवारी इ.स. १९९४) हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जातात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वतः काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्यांचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते.
बालपण आणि संगीत शिक्षण
सचिनदेव बर्मन १९४४ साली कलकत्त्याहून मुंबईत आले. त्यावेळी राहुलदेव पाच वर्षांचा होता. मात्र, चित्रपटसृष्टीत जम बसेपर्यंत कुटुंबाला येथे ठेवण्यात अर्थ नाही, या निर्णयापर्यंत सचिनदेव आले आणि त्यांनी माय-लेकांना पुन्हा कलकत्त्याला धाडले. कलकत्त्यात लहानाचा मोठा झालेल्या राहुलदेवला अभ्यासात कधीच रस नव्हता. त्याचा दिवस सायकल चालवणे, पोहणे, मित्रांसोबत भटकणे यातच संपत असे. कुठेही न शिकता त्याने माऊथ ऑर्गनवर प्रभुत्व मिळवले. वेळ काढून कलकत्त्यात येणारे सचिनदेव मुलाच्या करामती पाहून काळजीत पडत. हा मुलगा तर फारच उनाड झाला आहे, मोठेपणी तो काय करणार, असा त्यांचा नेहमीचा सूर असे.. सचिनदांचा हा दृष्टिकोन राहुलदेवच्या शाळेतील बक्षीससमारंभामुळे बदलला. या कार्यक्रमात सचिनदेवांच्या प्रमुख उपस्थितीत राहुलने व्यासपीठावरून माऊथ ऑर्गन सफाईदारपणे वाजवून दाखवला. दुसऱ्या दिवशी सचिनदेवांनी त्याला विचारले, पुढे काय करायचे ठरवले आहेस, यावर ‘मला तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार व्हायचे आहे’ हे राहुलचे उत्तर सचिनदेवांसाठी अनपेक्षित होते.
या प्रसंगानंतर सचिनदेवांनी राहुलला प्रथम ब्रजेन विश्वास यांच्याकडे तबला व पुढे उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोद शिकण्यासाठी धाडले. त्यानंतर राहुलदेवने दाखवलेला झापाटा विलक्षण होता.
वयाच्या १६व्या वर्षी मुंबईत दाखल झालेला राहुल लगेचच वडिलांचा साहाय्यक म्हणून काम करू लागला. एवढेच नव्हे तर त्या वयात त्याने स्वरबद्ध केलेल्या 'ए मेरी टोपी पलटके आ' (फंटूश) आणि 'सर जो तेरा चकराए' (प्यासा) या चालींचा सचिनदेवांनी उपयोग केला. सचिनदेवांचा भर लोकगीतांवर तर राहुलदेवांना कोणताही संगीतप्रकार वर्ज्य नव्हता, साहजिकच ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटापासून पंचमच्या करामतीमुळे सचिनदेवांच्या गाण्यांची शैली कमालीची बदलली.
सचिनदेवांबरोबर स्पर्धा
सचिनदेवांना साहाय्य करण्यात राहुलदेवांची उमेदीतील अनेक वर्षे वाया गेली. सचिनदांनी नाकारलेला 'भूत बंगला' हा चित्रपट त्याला मिळाला, परंतु मेहमूदने त्यापूर्वी ‘छोटे नबाब’ची निर्मिती सुरू केली आणि तो राहुलदेव बर्मन यांचा पहिला सिनेमा ठरला. ‘आराधना’च्या गाण्यांच्या निर्मितीत पंचमचा सिंहाचा वाटा असूनही त्या गाण्यांच्या तबकड्यांचे अनावरण सचिनदेवांच्या निवासस्थानी झाले, तेव्हा राहुलचे कोणीही कौतुक केले नाही, पूर्ण कार्यक्रमभर तो एका कोपऱ्यात उभा होता. स्वतंत्रपणे संगीत देण्याची हीच वेळ आहे, या निर्णयापर्यंत तेव्हा तो आला.
वडील आणि मुलगा आता स्पर्धक झाले. पंचम एकेक शिखर सर करत असताना सचिनदेव मात्र झाकोळले जाऊ लागले. ‘१ ऑक्टोबर १९७४, या सचिनदेवांच्या वाढदिवसाच्या रात्री न चुकता घरी फेरी राहुलदेव रात्री अकरा वाजता घरी पोहोचलो. दाराची बेल वाजवणार तोच माझ्या कानावर 'आप की कसम' आणि 'अजनबी' या चित्रपटांतील गाणी पडली. वडील माझी गाणी ऐकतायत हे कळल्यानंतर राहुलदेवांनी संकोचून बाहेरच थांबणे पसंत केले. गाण्यांचा आवाज थांबल्यानंतर ते. घरात शिरले. त्यानंतर सचिनदेव म्हणाले, 'पंचम माझ्यापेक्षा मोठा संगीतकार झाला आहे हे मी मान्य करतो, असा मुलगा लाभणे ही भाग्याची गोष्ट आहे. गुणवत्तेच्या कसोटीवर मुलगा वडिलांपेक्षा श्रेष्ठ ठरत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही'
चित्रपट
आर.डी. बर्मन यांच्याविषयीची पुस्तके
- आर.डी. बर्मन - जीवन संगीत (मूळ इंग्रजी, लेखक अनिरुद्ध भट्टाचार्य व बालाजी विठ्ठल; मराठी अनुवाद मुकेश माचकर) - राष्ट्रीय पुरस्कार विजेते पुस्तक
- आर. डी. बर्मन : द प्रिन्स ऑफ म्युझिक (इंग्रजी, लेखक – खगेशदेव बर्मन)
बाह्य दुवे
|
---|
1954–1960 | |
---|
1961–1980 | |
---|
1981–2000 | |
---|
2001–चालू | |
---|