खय्याम (जन्म : रहोन-पंजाब, १८ फेब्रुवारी १९२७; - मुंबई, १९ ऑगस्ट २०१९) हे भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.[१]
अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.
प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराची एक अमिट छाप असते.
|ॲक्सेसदिनांक=