एडवर्ड मुतेसा दुसरा (नोव्हेंबर १९, इ.स. १९२४ - नोव्हेंबर २१, इ.स. १९६९) हा इ.स. १९३९ पासून मृत्युपर्यंत आफ्रिकेतील बुगांडा या प्रदेशाचा राजा व इ.स. १९६३ ते इ.स. १९६६ या कालखंडात युगांडाचा राष्ट्राध्यक्ष होता.
याचे पूर्ण नाव सर एडवर्ड फ्रेडरिक विल्यम डेव्हिड वालुगेम्बे मुटेबी लुवांगुला मुतेसा असे होते. त्याचा उल्लेख किंग फ्रेडी असाही होत असे.