मार्गो बेट्टी फ्रँक (१६ फेब्रुवारी, इ.स. १९२६ – ९ मार्च, इ.स. १९४५) ही अॅन फ्रँकची मोठी बहीण होती. तिचा जन्म फ्रांकफुर्ट, जर्मनी येथे झाला. इ.स. १९३३मध्ये नाझी पक्षाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रँक कुटुंब जर्मनीतून अॅम्स्टरडॅमला स्थलांतरित झाले. मात्र इ.स. १९४०पर्यंत नाझी जर्मनीने नेदरलॅंड्सवर सत्ता मिळवली. इ.स. १९४२मध्ये तिला गेस्टापोकडून छळछावणीत पाठविण्यासाठी नोटीस आली. यामुळे सर्व कुटुंबाला त्वरित ऑटो फ्रँकच्या कार्यालयातील गुप्त खोल्यांमध्ये लपावे लागले. ४ ऑगस्ट, इ.स. १९४४ रोजी विश्वासघाताने त्यांना पकडण्यात आले व बर्गन-बेल्सन छळछावणीत पाठविण्यात आले. तिथेच ९ मार्च, इ.स. १९४५ रोजी मार्गोचा प्रलापक ज्वराने मृत्यू झाला. अॅनच्या दैनंदिनीतील नोंदीनुसार मार्गोसुद्धा दैनंदिनी लिहित असे. मात्र तिची दैनंदिनी अद्याप सापडली नाही आहे.
आख्तरहाएसमधील व्यक्ती |
---|
लपलेले | |
---|
मदतनीस | |
---|