मारिओ होआव कार्लोस दो रोसारिओ द ब्रिट द मिरांडा (रोमन लिपी, पोर्तुगीज: Mario João Carlos do Rosario de Brit de Miranda), अर्थात मारिओ मिरांडा (मराठी लेखनभेद: मारिओ द मिरांडा ; रोमन लिपी: Mario Miranda) (इ.स. १९२६; दमण, पोर्तुगीज भारत - ११ डिसेंबर, इ.स. २०११; लोटली, गोवा) हे प्रख्यात गोवेकर-भारतीय हास्यचित्रकार होते. यांचे वास्तव्य लोटली, गोवा येथे होते. इ.स. १९८८ साली पद्मश्री व इ.स. २००२ साली पद्मभूषण, पद्मविभूषणइ.स. २०१२ पुरस्कार देऊन हास्यचित्रकलेतील यांचे योगदान गौरवण्यात आले.
मिरांडा यांची हास्यचित्रे टाइम्स ऑफ इंडिया तसेच मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या अन्य वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असत. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या हास्यचित्रांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली.
जीवन
मारिओ मिरांडा याचा जन्म मूळच्या गौड सारस्वत ब्राह्मण, परंतु पुढे रोमन कॅथलिक बनलेल्या गोवेकर घराण्यात इ.स. १९२६ साली दमण येथे झाला [१]. इ.स. १७५० च्या सुमारास रोमन कॅथॉलिक धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांचे पूर्वज सरदेसाई आडनाव लावत असत[२].
संदर्भ व नोंदी
बाह्य दुवे