प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.
लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा
बौद्ध कलेची सुरुवात गौतम बुद्धांच्या जीवन आणि शिकवणुकीला समाजात रुजवण्यासाठी इ.स.पूर्व ५-६ व्या शतकांत जम्बूद्विपामध्ये झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक संस्कृतींसह तिचा झपाट्याने विकास होऊन ती आशिया तसेच जगात इतर ठिकाणी पसरली. बौद्ध कलेमध्ये मुख्यतः विविध प्रकारची बुद्ध विहारे, लेण्या, दगडावरील कोरीव चिन्हे, बुद्धांच्या विविध मुद्रा व प्रतिमांचा समावेश होतो. जसजसा बौद्ध धर्माचा प्रसार होत गेला तसतशी बौद्ध कलेच्या विकासाला गती मिळत गेली. बौद्ध कलेचा विकास मुख्यतः दोन शाखांमध्ये झाला. उत्तर शाखा; ज्यामध्ये मध्य आशियातून उत्तरेकडे तसेच पूर्व एशियाकडे आणि दक्षिण शाखा; ज्यामध्ये पूर्व तसेच दक्षिण-पूर्व एशियात बौद्ध कला पसरली.[ संदर्भ हवा ]
भारतामध्ये बौद्ध कलेचा विकास इ.स. तिसऱ्या शतकापर्यंत झपाट्याने होत गेला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून संपूर्ण भारतामध्ये (सध्याचा भारत, बांगलादेश, नेपाल, पाकिस्तान व अफगाणिस्तान) ८१,०००
पेक्षा जास्त बुद्ध विहार, बुद्ध स्तूप व लेण्यांची निर्मिती केली. परंतु सम्राट अशोकानंतर ५० वर्षांनी पुष्यमित्र शुंग या ब्राह्मण राज्यमंत्रांने राजसिंहासन हस्तगत करून मौर्य साम्राज्याचा व बौद्ध कलांचा नायनाट केला व बौद्ध कला भारतातून नाहीशी केली. परंतु उत्खननामध्ये सापडणारी अजिंठा-वेरूळ सारखी लेणी आजही भारतातील बौद्ध कला व इतिहासाची साक्ष देतात.
बौद्ध कलेचे इ.स.पूर्व १ ल्या शतकापासूनचे पुरावे सापडतात. बिहारमधीलबोध गया येथील महाबोधी विहारापासून प्रेरणा घेऊन म्यानमार आणि इंडोनेशियात अनेक रचना करण्यात आल्या. श्रीलंकेतील साइगीरीया (Saigiriya) येथील चित्रकला ही अजिंठ्याच्या लेणीतील चित्रकलेपेक्षा जुनी असल्याचे म्हणले जाते.
इ.स. पूर्व पहिल्या-दुसऱ्या शतकात शिल्पकला ही बुद्धाचं जीवन आणि त्याची शिकवणूक प्रदर्शित करण्याचं महत्त्वाचे साधन बनली. मुख्यतः स्तुपांना सजवण्यासाठी शिल्पकलेचा वापर करण्यात आला. भारताला उत्तम शिल्पकला व मुर्तीकलेची फार मोठी परंपरा लाभली असताना देखील बुद्धाला मानवी रूपात कधीही दाखवलं गेलं नाही, फक्त बौद्ध चिन्हांचाच वापर करण्यात आला. बुद्धाला फक्त चिन्हांच्या रूपातच दाखवण्यात आलं जसे की रिकामा दगड, बोधी वृक्ष, सारथ्याविना घोडा (सांचीमध्ये) बुद्धाचे पदचिन्ह किंवा धर्मचक्र इत्यादी. याचे कारण असे की, स्वतः बुद्ध मुर्तीपूजेचे विरोधक होते. ही प्रथा इ.स. दुसऱ्या शतकापर्यंत अशीच चालू राहीली ,ज्याचे पूरावे दक्षिण भारतातील अमरावती शाळेत सापडतात.
Iconic phase ( इ.स.१ ले शतक - आजपर्यंत)
===== बुद्धाला मानवीय रूपात दाखवण्याची सुरुवात उत्तर भारतात इ.स. १ ल्या शतकापासून झाली. यासाठी पाकिस्तानमधील गांधार (Gandhara) आणि मध्य भारतातील मथुरा ही प्रमुख केंद्रे बनली. गांधार (Gandhara)ची कला प्रामुख्याने ग्रीक संस्कृतीपासून प्रेरित झालेली दिसते, ज्यातून ग्रीक-बौद्ध कलेची निर्मिती झाली. असे म्हणले जाते की, "माणूस-देव" ही संकल्पना प्राचीन ग्रीक संस्कृतीपासून आली आहे. बुद्धाची लाटांसारखी केशरचना, दोन्ही खांद्यांवरील वस्त्र, पादुका हे सर्व गांधार कलेचे योगदान आहे. मथुरेतील कलेचा पाया प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारित आहे . डाव्या खाद्यांवरील वस्त्र , तळहातावरील चक्र व कमळाचे आसन हे सर्व मथुरा कलेची देण आहे.
आश्चर्याची बात म्हणजे बुद्धाविषयी अनेक शिल्पकला, चित्रे व साहित्याची निर्मिती झाली पण संगीत व नृत्य निर्मिती झाली नाही.
भारतात बौद्ध कलेचा विकास पुढील काही शतके होत राहिला. गुप्तकालीन (इ.स. ४-६) गुलाबी वालुकाश्म मूर्तीकला विकसित होऊन सूक्ष्मते व सुंदरते साठी प्रसिद्ध झाली. गुप्त शाळेची कला उर्वरीत संपूर्ण एशियामध्ये प्रचंड प्रभावशाली ठरली. १० व्या शतकापर्यंत जसजसे हिंदू व इस्लाम धर्म प्रबल होत गेले, बौद्ध कला भारतातून लुप्त होत गेली. १२ व्या शतकाच्या शेवटी मूळ बौद्ध धर्म हिमालयाच्या परीसरात संरक्षित राहिला होता. हा परिसर तिबेट आणि चीनशी अधिक संबंधित होता. म्हणूनच लद्दाखच्या कला आणि संस्कृतीवर असलेली तिबेट व चीनच्या संस्कृतीची छाप आढळते.
इ.स. पहिल्या शतकापासून जसजसा बौद्ध धर्म भारताबाहेर प्रसारित होत गेला मूळचा बौद्ध कलात्मक अंश इतर कलात्मक दृष्टिकोणांशी एकरूप होत गेला आणि देश व संस्कृतीनुसार त्यात फरक पडत गेला.
उत्तर मार्ग : इ.स. पहिल्या शतकापासून मध्य एशिया, नेपाळ , तिबेट, भूतान, चीन, कोरिया, जपान व विएतनाममध्ये स्थापित झाला व ज्यांनी महायान बौद्ध धर्म जोपासला.
दक्षिण मार्ग : जिथं थेरवादाला प्राधान्य देण्यात आलं आणि जो म्यानमार, श्रीलंका, थायलंड, कंबोडिया व लाओसमध्ये विकसित होत गेला. =====
उत्तर मार्ग:
===== रेशीम मार्गाने पहिल्या शतकापासून बौद्ध धर्म मध्य एशिया, चीन तसेच कोरिया व जपानमध्ये प्रसारित होत गेला. परंतु अधिक प्रसार व प्रचार २ र्या शतकात झाला. बहुतेक कुशाण (Kushan) साम्राज्याचा चीनच्या तरीम द्रोणी (Tarim Basin) मध्ये विस्तार झाल्यामुळे व मोठ्या संख्येत मध्य एशियातून चीनमध्ये आलेल्या बौद्ध धर्मप्रसारक भिक्षूंमुळे. मध्य एशियातील धर्मप्रसारकांचे प्रयत्न व त्यांना मिळत गेलेली कलात्मक प्रवाहाची साथ तरीम द्रोणीतील सेरींडियन कलेच्या (Serindian art) इ.स. २-११ व्या शतकाच्या विकासात पहायला मिळते. सेरींडियन कला (Serindian art) बहुदा पाकिस्तानातील गांधारच्या (Gandhara) बौद्ध-ग्रीक कलेपासून प्राप्त होते, ज्यावर भारत-ग्रीक आणि रोमन कलेचा प्रभाव आढळतो. रेशीम मार्गाचा बौद्ध-ग्रीक कलात्मक अंश आजही जपानपर्यंत मिळतो. उत्तर मार्गाच्या कलेवर महायान धर्माचा अधिक प्रभाव आहे . महायान धर्म, बौद्ध धर्माची एक समावेशक शाखा आहे जी पारंपारिक बौद्ध धम्म आदर्शाच्या (दुःखापासून मुक्त होऊन अर्हंत पद प्राप्त करणे) पुढे जाऊन बोधीसत्त्वाच्या पदापर्यंत जाण्यावर जोर देते.
=====
दक्षिण मार्ग :
श्रीलंका, थायलंड, म्यानमार, लाओस व कंबोडियातील बौद्ध धम्म दक्षिण बौद्ध धम्माच्या नावाने ओळखला जातो. इ.स. १ ल्या शतकात रोमन लोक श्रीमंत होत चालले होते आणि त्यांची एशियातून ऐषारामाच्या वस्तुंची मागणी वाढत चालली होती, परंतु जमिनीवरील रेशीम मर्गावर मध्य-पूर्वेत पार्थियन (Parthian) साम्राज्याच्या उदयाने बंधने वाढू लागली , ज्यांचे रोमन साम्राज्याशी वैर होते. यामुळे भूमध्यसागर आणि चीनचे संबंध वाढत गेले व भारत त्यांचा मध्यस्थी बनला. तेंव्हापासून व्यापार, वाणिज्य तसेच राजकीय बाबतीत भारताचा इतर दक्षिण-पूर्व एशियन देशावर परिणाम दिसू लागला. १ हजारपेक्षा जास्त वर्षे या प्रदेशात सांस्कृतिक एकता स्थापित करण्यात भारताचा हात होता. ज्यामुळे भारतीय पाली व संस्कृत भाषा व इतर साहित्य आणि महायान व थेरीवाद बौद्ध धम्माशी त्यांचा संबंध वाढला व त्या त्या ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रसार होऊन बौद्ध कलेला अनेक प्रादेशिक दिशा प्राप्त झाल्या . इ.स. ९ ते १३ व्या शतकात दक्षिण-पूर्व एशियात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होती. या काळात बौद्ध वास्तूशास्ञिय व कलात्मक निर्मिती सक्रिय झाली होती . उत्तरेकडिल श्री विजयाचे (Sri Vijaya )साम्राज्य आणि दक्षिणेकडील Khmer साम्राज्यातील कला महायान बौद्ध धम्मावर आधारित होत्या. इ.स. १३ व्या शतकात पाली सिद्धांतावर आधारित थेरीवादाचा श्रीलंकेत उदय झाला ,जो नंतर दक्षिण एशियातील इतर देशापर्यंत पोहोचला. १४ व्या शतकात दक्षिण-पूर्व एशियातील काही भागावर इस्लाम धर्माचा प्रभाव वाढत चालला होता, परंतु महाद्विपामध्ये थेरवादाचा बर्मा, लाओस आणि कंबोडियामध्ये प्रसार होत राहिला.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!