बेनितो हुआरेझ
|
|
|
कार्यकाळ १५ जानेवारी १८५८ – १० एप्रिल १८६४
|
मागील
|
इग्नाचियो कोमोनफोर्त
|
पुढील
|
पहिला माक्सिमिलियन
|
कार्यकाळ १५ मे १८६७ – १८ जुलै १८७२
|
मागील
|
पहिला माक्सिमिलियन
|
पुढील
|
सेबास्तियन लेर्दो दे तेहादा
|
|
कार्यकाळ १८४७ – १८५२
|
|
जन्म
|
२१ मार्च, १८०६ (1806-03-21) सान पाब्लो ग्वेलाताओ, वाशाका, मेक्सिको
|
मृत्यू
|
१८ जुलै, १८७२ (वय ६६) मेक्सिको सिटी
|
बेनितो पाब्लो हुआरेझ गार्सिया (स्पॅनिश: Benito Pablo Juárez García; २१ मार्च १८०६ - १८ जुलै १८७२) हा मेक्सिको देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पेशाने वकील असलेला हुआरेझ १८५८ साली मेक्सिकोच्या सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष बनला व नव्या संविधानानुसार त्याची नियुक्ती आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर झाली. १८६१ साली हुआरेझने स्पेन, फ्रान्स व ब्रिटन ह्यांच्याकडून मेक्सिकन सरकारने घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यास नकार दिला. ह्यामुळे संतापलेल्या नेपोलियनने मेक्सिकोमध्ये सैन्य पाठवले व लष्करी आक्रमण करून तेथे दुसरे मेक्सिकन साम्राज्य प्रस्थापित केले. १८६४ ते १८६७ दरम्यान अस्तित्वात असलेले हे साम्राज्य १८६७ साली हुआरेझच्या नेतृत्वाखालील मेक्सिकन सेनेद्वारे पराभूत झाले व हुआरेझ पुन्हा एकदा मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष बनला.
आपल्या कारकिर्दीमध्ये हुआरेझने मेक्सिकोमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या.
बाह्य दुवे