बेन गुरियन विमानतळ (आहसंवि: TLV, आप्रविको: LLBG) हा इस्रायल देशामधील सर्वात मोठा व तेल अवीव शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ तेल अवीवच्या १९ किमी ईशान्येस स्थित आहे. १९३६ साली ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या विमानतळाला १९७३ साली इस्रायलचा पहिला पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन ह्याचे नाव देण्यात आले. आर्किया इस्रायल एरलाइन्स, एल ॲल इत्यादी इस्रायलमधील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांचे प्रमुख वाहतूकतळ येथेच आहेत. २०१३ साली बेन गुरियन विमानतळाचा १.४२ कोटी प्रवाशांनी वापर केला.