बी.के.एस. अय्यंगार


बी.के.एस. अय्यंगार
जन्म १४ डिसेंबर, १९१८ (1918-12-14)
बेल्लूर, म्हैसूरचे राज्य (आजचा कर्नाटक)
मृत्यू २० ऑगस्ट, २०१४ (वय ९५)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे योगाचार्य
पेशा योगासन प्रशिक्षक, लेखक

बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार (कानडी: ಬೆಳ್ಳೂರು ಕೃಷ್ಣಮಾಚಾರ್ ಸುಂದರರಾಜ ಐಯ್ಯಂಗಾರ್; १४ डिसेंबर, इ.स. १९१८ - २० ऑगस्ट, इ.स. २०१४) हे एक भारतीय योग प्रशिक्षक व लेखक होते. त्यांना अय्यंगार योगा ह्या हठ योग पद्धतीचे जनक मानले जाते. अय्यंगार हे जगातील सर्वोत्तम योग प्रशिक्षकांपैकी एक मानले जात असत. भारतभर व जगभर योगासने लोकप्रिय करण्याचे श्रेय अय्यंगारांना दिले जाते.

अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना १९९१ साली पद्मश्री, २००२ साली पद्मभूषण तर २०१४ साली पद्मविभूषण हे पुरस्कार बहाल केले. २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी हृदयधक्क्याने त्यांचे निधन झाले.

बी.के.एस. अय्यंगार यांनी लिहिलेली पुस्तके (सर्व इंग्रजी)

  • अय्यंगार योगा फॉर बिगिनर्स
  • अष्टदल योगमाला खंड १, २.
  • आरोग्य योग (मराठी)
  • दि आर्ट ऑफ योगा
  • दि इलस्ट्रेटेड लाईट ऑन योगा
  • दि कन्साइज लाईट ऑन योगा
  • कोअर ऑफ योगसूत्राज
  • ट्री ऑफ योगा
  • बॉडी विझडम योगा
  • योग एक कल्पतरू (मराठी)
  • योगदीपिका (मराठी
  • योग मकरंद
  • योग सर्वांसाठी (मराठी)
  • योगा दि पाथ टु होलिस्टिक हेल्थ
  • योगा फॉर मदरहुड
  • लाईट ऑन अष्टांग योगा
  • लाईट ऑन प्राणायमा
  • योगा : विझडम अँड प्रॅक्टिस
  • लाईट ऑन योगसूत्राज ऑफ पतंजली
  • लाईट ऑन योगा
  • लाईट ऑन योगा एच्‌बी
  • लाईट ऑन लाईफ - योगा जर्नी टू...
  • हीलिंग रिलॅक्सेशन

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!