प्रियंका गांधी यांचे शालेय शिक्षण मॉडर्न स्कूल (नवी दिल्ली) आणि कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी, दिल्ली येथे झाले. त्यांनी जीसस अँड मेरी कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली, आणि नंतर 2010 मध्ये बौद्ध अभ्यासात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.[२][३]
राजकीय कारकीर्द
गांधी आपल्या आईच्या आणि भावाच्या रायबरेली आणि अमेठीच्या मतदारसंघांना नियमित भेट देत होत्या, जिथे त्या नेहमी थेट लोकांशी संवाद साधत असायच्या.[४] 2004च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्या आई सोनियांच्या प्रचार व्यवस्थापक होत्या आणि त्यांनी भाऊ राहुल गांधी यांच्या प्रचारावर देखरेख केले.[५]
2007च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, राहुल गांधींनी राज्यव्यापी प्रचाराची धुरा सांभाळत असताना, त्यांनी अमेठी रायबरेली प्रदेशातील दहा जागांवर लक्ष केंद्रित केले, जागा वाटपावरून पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील भांडण शमवण्यासाठी दोन आठवडे घालवले.[६]
सक्रिय राजकारण आणि AICC सरचिटणीस
23 जानेवारी 2019 रोजी, प्रियांका गांधी यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला, त्यांना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या प्रभारी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्त केले गेले.[७] 11 सप्टेंबर 2020 रोजी तिची संपूर्ण उत्तर प्रदेश प्रभारी महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ऑक्टोबर 2021 मध्ये, पोलीस कोठडीत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आग्रा येथे जात असताना गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांनी मेळाव्यावर बंदी घातली होती.[८]
2022 उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक
प्रियंका गांधी यांनी 23 ऑक्टोबर 2021 रोजी बाराबंकी येथून काँग्रेस पक्षाच्या उत्तर प्रदेश निवडणूक प्रचाराची सुरुवात केली.[९] काँग्रेस पक्ष 2022ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक गांधींच्या नेतृत्वाखाली लढणार आहे.
2022च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत त्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्याची शक्यता आहे.[१०][११]
खाजगी आयुष्य
त्यांचे लग्न दिल्लीतील व्यापारी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी झाले. 18 फेब्रुवारी 1997 रोजी गांधींच्या घरी, १० जनपथ येथे हा विवाह पारंपारिक हिंदू समारंभात झाला.[१२] एक मुलगा आणि मुलगी अशी त्यांना दोन मुले आहेत
प्रियंका या बौद्ध तत्त्वज्ञानाचे पालन करतात आणि एस.एन. गोएंका यांच्या मार्गदर्शनाखाली विपश्यना करतात.[१३]