P. Parameswaran (es); পি. পরমেশ্বরম (bn); P. Parameswaran (fr); P. Parameswaran (ast); P. Parameswaran (ca); पी. परमेश्वरन (mr); ପି ପରମେଶ୍ୱରନ (or); P. Parameswaran (ga); P·帕拉梅斯瓦蘭 (zh); P. Parameswaran (sl); P. Parameswaran (id); പി. പരമേശ്വരൻ (ml); P. Parameswaran (nl); प परमेश्वरण (hi); పి. పరమేశ్వరన్ (te); P. Parameswaran (en); P. Parameswaran (sq); பி. பரமேஷ்வரன் (ta) filosofo indiano (it); ভারতীয় দার্শনিক (bn); philosophe indien (fr); India filosoof (et); filósofu indiu (ast); filòsof indi (ca); Indian philosopher (en); ଭାରତୀୟ ଦର୍ଶନଶାସ୍ତ୍ରବିତ୍ (or); filozof indian (sq); فیلسوف هندی (fa); filosof indian (ro); פילוסוף הודי (he); Indian philosopher (en-ca); fealsamh Indiach (ga); രാഷ്ട്രീയ സ്വയംസേവക സംഘത്തിന്റെ പ്രചാരകൻ (ml); Indiaas filosoof (nl); filósofo indio (gl); भारतीय दार्शनिक (hi); భారత తత్త్వవేత్త (te); Indian philosopher (en-gb); Indian philosopher (en); فيلسوف هندي (ar); filósofo indio (es); இந்திய தத்துவவாதி (ta) P. Parameswaran (ml)
पी. परमेश्वरन Indian philosopher |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
जन्म तारीख | इ.स. १९२७ केरळ |
---|
मृत्यू तारीख | फेब्रुवारी ९, इ.स. २०२० Mayannur |
नागरिकत्व | |
---|
शिक्षण घेतलेली संस्था | - St. Berchmans College
- University College Thiruvananthapuram
|
---|
व्यवसाय | |
---|
राजकीय पक्षाचा सभासद | |
---|
पुरस्कार | |
---|
|
|
|
पी. परमेश्वरन (अनेकदा परमेश्वरजी असे संबोधले जाते) (जन्म: १९२७) हे केरळ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे प्रचारक आहे. हे जनसंघाचे पूर्वीचे उपाध्यक्ष पण होते.
परमेश्वरन हे विवेकानंद केंद्राचे विद्यमान अध्यक्ष आहेत, जी हिंदू राष्ट्रवादी आध्यात्मिक संघटना आहेत आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीवर आधारित आहेत. २०१५ च्या गांधी शांती पुरस्काराने विवेकानंद केंद्राला गौरविण्यात आले. परमेश्वरन यांना २०१८ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.[१][२] २००४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
जीवन
१९२७ मध्ये अलप्पुळा जिल्ह्यातील थमारसेरिल इल्लम चेरथला या गावी झाला. येथे परमेश्वरन यांचे शालेय शिक्षणा झाले व नंतर सेंट बर्चमन्स महाविद्यालयात पुढील शिक्षण सुरू केले. तिरुअनंतपुरम येथील विद्यापीठ महाविद्यालयातून बी.ए. (ऑनर्स) मधील इतिहास विशिष्टतेसह पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच हिंदू धर्माच्या अभ्यासाकडे त्यांचा जास्त कल होता. ते बहुतांश हिंदू सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांशी जवळून जोडलेले होता. परमेश्वरन हे ब्रह्मचारी असून त्यांनी लग्न केले नाही.
महाविद्यालयीन काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. ते स्वामी अगमानंद यांचे शिष्यही होते. माधव गोळवलकरांच्या निर्देशानुसार, जे आरएसएसचे सरसंघचालक होते, परमेश्वरन हे १९५० मध्ये आरएसएसचे प्रचारक झाला. १९५७ मध्ये त्यांनी भारतीय जनसंघाचे संघटन सचिव म्हणून काम पाहिले. १९६८ मध्ये ते अखिल भारतीय सरचिटणीस आणि नंतर जनसंघाचे उपाध्यक्ष झाले. १९७५-७७ च्या भारतीय आणीबाणीच्या वेळी त्याला तुरूंगात डांबण्यात आले. १९७७ मध्ये परमेश्वरन राजकारणापासून सामाजिक विचार आणि विकासाच्या क्षेत्रात गेले. नानाजी देशमुख यांनी चार वर्षांपासून सुरू केलेल्या दीनदयाळ संशोधन संस्थेचे त्यांनी नवी दिल्ली येथे संचालक म्हणून काम केले.
१९८२ मध्ये ते पुन्हा केरळमध्ये आले आणि त्यांनी एका नव्या संघटनेला आकार दिला; भारतीय विचार केंद्र, ज्याचा अभ्यास व संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुनर्रचना करण्याचा उद्देश आहे. तिरुअनंतपुरम येथे त्याचे मुख्यालय आहे आणि राज्यभरात त्यांच्या शाखा आहेत. त्यांनी रामकृष्ण मिशनमधुन दीक्षा घेतली. ते गीता स्वाध्याय समितीचे संरक्षक आहेत, ज्यांनी तरुणांमध्ये भगवद गीतेच्या विचारसरणीला प्रोत्साहन दिले. डिसेंबर २००० मध्ये, गीता स्वाध्याय समितीने तिरुअनंतपुरम येथे एक चर्चासत्र आयोजित केले होते ज्यामध्ये १५00 पेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला होता; ज्यात मुरली मनोहर जोशी आणि दलाई लामा पण होते. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवर लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी राष्ट्रीय विषयांवर देशभर व्याख्याने दिली आहेत.
संदर्भ