पश्चिम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्यावांद्रे टर्मिनस ते पंजाबच्याअमृतसर स्थानकांदरम्यान रोज धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या पश्चिम एक्सप्रेसला मुंबई ते अमृतसर दरम्यानचे १,८२१ किमी अंतर पार करायला ३१ तास लागतात. या ट्रेनचा डाउन क्रमांक १२९२५ आणि अप क्रमांक १२९२६ आहे. ही ट्रेन आठवड्यातील सातही दिवस धावते.
इतिहास
या गाडीला पश्चिम सुपर डिलक्स एक्सप्रेस या नावानेही ओळखतात.[१] ही गाडी मुंबई सेंट्रल स्टेशन मधून बांद्रा टर्मिनस कडे वर्ग झालेल्या गाड्यांपैकी एक आहे. परतीच्या प्रवासासाठी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक १२९२६ म्हणून निघते तेव्हा हजरत निजामूद्दीन स्टेशनवर ही थांबत नाही.
बोगी
पश्चिम एक्सप्रेस या ट्रेनला १ ए/सी प्रथम वर्ग, ३ ए/सी २ टायर, ५ ए/सी ३ टायर, ८ शयन यान वर्ग, ३ सामान्य विनाआरक्षित बोगी आणि ४ सामान सुविधेसह सामान्य बोगी आहेत. ट्रेन क्रमांक २२९२५/२२९२६ च्या कळका साठी जाणाऱ्या ट्रेनच्या बोगींचा यात समावेश आहे. या ट्रेन मध्ये खान पान व्यवस्था आहे.
भारतीय रेल्वेचे सुविधा नुसार रेल्वेचे अधिकारात बोगीचे व्यवस्थेत मागणीनुसार बदल केला जातो.[२] त्यात रेक /बोगी LOCO-RMS-GEN-S6-S5-S4-S3-S2-S1-PC-B4-B3-B2-B1-A2-A1-H1-GEN-GEN-SLR-S7-S8-B5-A3-SLR. यांचा समावेश आहे.
तपशील
गाडी क्रमांक
मार्ग
प्रस्थान
आगमन
कधी
१२९२५
मुंबई वांद्रे टर्मिनस – अमृतसर
११:३५
१९:२०
रोज
१२९२६
अमृतसर – वांद्रे टर्मिनस
०८:१०
१४:४५
रोज
सुविधा
पश्चिम एक्सप्रेस ही ट्रेन मुंबई – अमृतसर-कळका असी धावते. या ट्रेनचे अंबाला कॅंटॉन्मेंट जंक्शन स्टेशनवर विभाजन होते. रोज धावणारी क्रमांक १२९२५ ही ट्रेन ३१ तास आणि ४५ मी. आणि क्रमांक १२९२६ ही ३० तास व ३५ मी.त १८२१ किमीअंतर तोडते. या ट्रेनचा सरासरी तासी ५७.३५ की.मी आणि ५९.५४ की.मी अनुक्रमे वेग आहे. तसेच जाने आणि येणे या प्रवासाचा सरासरी वेग तासी ५८-४३ किमीआहे
इंजिन (Traction)
दि.५ फेब्रुवारी २०१२ रोजी पश्चिम रेल्वेने DC इलेक्ट्रिक इंजिन ऐवजी AC इंजिन या ट्रेनसाठी वापरात आणले. सध्या गाझियाबाद येथील वाप (WAP) ७ आणि वाप (वाप) ५ चे इंजिनचे मदतीने या ट्रेनचा पूर्ण प्रवास केला जातो.