न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९७९ मध्ये तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. शॅरन ट्रेड्रियाने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ट्रिश मॅककेल्वीकडे होते. महिला कसोटी सोबतच न्यू झीलंडने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. महिला कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन महिलांनी १-० अशी जिंकली.