न्यू झीलंड पुरुष क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१][२] एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मार्च २०२३ मध्ये दौऱ्यासाठीचे सामने जाहीर केले.[३] याआधी केवळ १९९६ विश्वचषकात न्यू झीलंडने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामना खेळला होता.[४]
न्यू झीलंडने पहिला टी२०आ १९ धावांनी जिंकला,[५] त्यानंतर दुसऱ्या टी२०आ मध्ये संयुक्त अरब अमिरातीने न्यू झीलंडचा पराभव केला.[६] न्यू झीलंडवर संयुक्त अरब अमिरातीचा हा पहिला आंतरराष्ट्रीय विजय आणि सहयोगी संघाविरुद्ध न्यू झीलंडचा पहिला पराभव होता.[७] न्यू झीलंडने मालिकेतील शेवटचा सामना जिंकून मालिका २-१ ने जिंकली.[८]