न्यू गिनी हे ओशनिया खंडातील एक बेट आहे. न्यू गिनी दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला वसले आहे.
न्यू गिनी बेटाचा पूर्वेकडील अर्धा भाग पापुआ न्यू गिनी ह्या देशाने व्यापला आहे तर पश्चिमेकडील भागामध्ये इंडोनेशिया देशाचे पापुआ व पश्चिम पापुआ हे दोन प्रांत आहेत.