ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
इ.स. १८२९ ते इ.स. १८७२ अशी ४३ वर्षे ते महसूल खात्यात नोकरी करत होते. खात्यात बढती मिळाल्यानंतर त्यांनी येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा व शेवटी सटाणा येथे मामलेदार म्हणून काम पाहिले. सटाणा येथूनच ते निवृत्त झाले.
कार्य
स्वातंत्र्यपूर्व काळात १८७०-७१ दरम्यान नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात भीषण दुष्काळ पडला. त्यावेळेस तेथे मामलेदार असलेले यशवंतराव भोसेकर यांनी सरकारी खजिन्यातून एक लाख २७ हजार रुपये नागरिकांना वाटले,व जेव्हा हे वरील इंग्रज अधिकाऱ्याला कळाले तेव्हा ते खजिन्याची तपासणी करण्यासाठी आले तेव्हा तो सर्व खजिना तसाच तिजोरीमध्ये त्यांना दिसला. हा चमत्कार खूप मोठा होता. असे बरेच चमत्कार त्यांनी बागलाणकरानां दाखवले. तेव्हा पासून लोकांनी त्यांना देव मानले. त्यांच्या सत्प्रवृत्तीमुळे व कार्यामुळे लोक त्यांना देव मामलेदार वा यशवंतराव महाराज अशा नावाने ओळखू लागले.
उत्सव व यात्रा
त्यांच्या मृत्यूनंतर बागलाण तालुक्यातील सटाणा या गावी त्यांचे मंदिर बांधण्यात आले. संपूर्ण भारत देशात सरकारी अधिकाऱ्याचे मंदिर हे फक्त यशवंतराव महाराज यांचेच आहे. या मंदिरात त्यांचा पुतळा उभारण्यात आला असून त्याची रोज पूजा केली जाते. मंदिरात धार्मिक पारायणे होतात. सटाणा येथे महाराजांच्या पुण्यतिथी दिनी इ.स.१९००मध्ये पहिला यात्रोत्सव सुरू झाला. तेव्हापासून दरवर्षी हा यात्रोत्सव होतो. १५ दिवस हा सुरू असतो.
त्यांनी केलेले काम कसे होते हे पुढच्या पिढीला समजावे म्हणून त्यांच्या मंदिराजवळच भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. जुनी कचेरी, देवमामालेदारांचे राहण्याचे घर, महाराज कामकाज करायचे ती खोली, घोड फागा, त्या काळातील कैदी ठेवले जायचे ते जेल, असे बरेच काही त्या स्मारकामध्ये आहे.
देव मामलेदार यांचा १२ डिसेंबर १८८७ रोजी नाशिक येथे मृत्यू झाला. नाशिककरांनी गोदावरीतटीरामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले व त्या परिसराला यशवंतराव महाराज पटांगण असे नाव दिले.
संदर्भ
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!