धरमदेव आनंद ऊर्फ देव आनंद (२६ सप्टेंबर, १९२३; गुरदासपूर, - ३ डिसेंबर, २०११; लंडन) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. भारताच्या केंद्रशासनाने इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले.[ संदर्भ हवा ]
जीवन
इ.स. १९४६ साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला 'हम एक है' या चित्रपटाने सुरुवात झाली. इ.स. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि ३५हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली.[ संदर्भ हवा ] त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर-गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठाना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.[ संदर्भ हवा ]
संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणाऱ्या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई.[१]
मृत्यू
देव आनंद यांचा ३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी वयाच्या ८८व्या वर्षी लंडन, इंग्लंड मुक्कामी हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. ते वैद्यकीय तपासण्यांसाठीच लंडन येथे गेले होते[ संदर्भ हवा ].
चित्रपट कारकीर्द
- इ.स. १९४६ - हम एक है - प्रभातच्या सिनेमातून सुरुवात[ संदर्भ हवा ]
- इ.स. १९४७ - जिद्दी- पहिला हीट सिनेमा-गुरुदत्त यांचं दिग्दर्शन[ संदर्भ हवा ]
प्रसिद्ध चित्रपट
जिद्दी, पेईंग गेस्ट,बाजी, ज्वेल थिफ सीआयडी, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, गाईड, वॉरंट, हरे रामा हरे कृष्णा आणि नौ दो ग्यारह.[ संदर्भ हवा ]
- इ.स. १९५० - काला पानी चित्रपटासाठी बेस्ट ॲक्टर, फिल्मफेअर पुरस्कार
- इ.स. १९६५ - गाइड चित्रपटासाठी बेस्ट ॲक्टर,[फिल्मफेर पुरस्कार|फिल्मफेर पुरस्कार]
- इ.स. २००१ - [पद्मभूषण पुरस्कार]
- इ.स. २००२ - [दादासाहेब फाळके पुरस्कार]
- इ.स. २००० - भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल अमेरिकेतर्फे सन्मान, हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला होता.
- इ.स. २००० - इंडो-अमेरिकन असो.चा स्टार ऑफ मिलेनियम सिलीकॉन व्हॅलीत हा सन्मान करण्यात आला होता.
संदर्भ
बाह्य दुवे