जयश्री देसाई या एक ज्येष्ठ मराठी पत्रकार, लेखिका आणि अनुवादक आहेत.
१९८२ पासून त्यांनी पूर्ण वेळ पत्रकारिता केली . आधी मुंबई तरुण भारत , मग लोकप्रभा आणि चित्रलेखा ही साप्ताहिकं आणि नंतर मैत्रीण भटकंती ही मासिकं तसेच मैत्रेय प्रकाशनाची संपादिका म्हणून त्यांनी काम पाहिलं. ज्येष्ठ मराठी साहित्यिक कै. श्री प्रभाकर अत्रे यांच्या त्या कन्या [१]
त्या कथा लेखन तसेच मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांत कविताही करतात
महाराष्ट्राचे भाषा धोरण ठरवण्यासाठीच्या राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीची सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे .तसेच मुंबई विद्यापीठात पत्रकारितेच्या मुलांना अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे
जयश्री देसाई यांनी लिहिलेली पुस्तके
- प्रकाशित पुस्तके-- 1. अयोध्या आंदोलन--काल, आज आणि उद्या 2. शापित सौंदर्यभूमी पूर्वांचल 3. राजयोगी नेता अटल बिहारी वाजपेयी 4. राजयोगी नेता अटल बिहारी वाजपेयी [ गुजराती आवृत्ती] 5. सेलेब्रिटीज डेस्टीनेशन 6. कैफी आणि मी [अनुवाद] -मूळ लेखिका शौकत कैफी 7. मेकअप उतरवल्यानंतर-अभिनेत्री मृणाल कुलकर्णीच्या पुस्तकाचे पुनर्लेखन 8. तरकश [अनुवाद]–- मूळ लेखक—गीतकार, पटकथाकार जावेद अख्तर [ हे जावेद अख्तर यांचे मराठीत आलेले पहिले साहित्य आहे ] 9. अक्षय गाणे [अनुवाद] मूळ लेखिका- पद्मा सचदेव 10. बॉडी गॉडेस [अनुवाद]--मूळ लेखिका–पायल गिडवानी 11. अयोध्येत श्रीरामाची विजय पताका—याला ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा वा अ रेगे पुरस्कार मिळाला आहे 12. माय फादर माय गॉड—इंग्रजी लघु कादंबरी 13. जयदीप –डॉ दीपक कामले. 14. Beat Corona…Health in your hands! 15. इंग्रजी लघु कादंबरी -Kiss of Life 16. विष्णुमय जग –[ माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे चरित्र] 17. चेहऱ्याआडचे चेहेरे 18. काश्मीर: तेव्हा आणि आता...३७० नंतरची नवी पहाट 19. साक्ष 20. हस्त मुद्रा-आधी केले मग सांगितले [प्रकाशनाच्या मार्गावर]
- पर्यायी उपचार पद्धतींच्या त्या साधक आहेत. त्या ज्ञानाच्या आधारावर त्या ‘ Ultimate आरोग्य’ हे यु ट्यूब चॅनल चालवतात
- चॅनल लिंक --https://youtube.com/@ultimate815 • Website - www.jayashreedesai.com • Amazon author page -- https://www.amazon.com/author/jayashridesai
- ^ "Content development journalist jayashri desai | Mumbai". Mysite (इंग्रजी भाषेत). 2025-01-01 रोजी पाहिले.