गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आहे. ह्या गुहा एनएच-17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत. हे एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. ही लेणी रायगड जिल्ह्यातील महाड जवळ गांधारपाले या गावातील डोंगरावर आहेत. यांचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे.
ही लेणी महाराष्ट्रातीलरायगड जिल्ह्याच्यामहाड तालुक्यातील बौद्ध लेणी आहे. ही लेणी राष्ट्रीय महामार्ग ६६ वर महाडच्या उत्तरेस ३ किमी अंतररावर असलेल्या डोंगरात कोरलेली आहेत. हा एकूण ३० लेण्यांचा समुह असुन ३ चैत्यगृह व १९ विहार आहेत. लेणे क्र.१ मधे ५३ फुट लांब व ८ फुट रुंद ओसरी आहे. गर्भगृहात गौतम बुद्ध यांची मुर्ती व धम्मचक्र कोरलेली आहेत. लेणे क्र.२१ में गौतम बुद्ध यांची बसलेली मुर्ती,त्यांचे शिष्य व हरिणाची चित्र कोरली आहेत.[१]
येथिल शिलालेखा नुसार ही लेणी बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णू पुलित यांच्या कारकीर्दित ई.स. १३० च्या आसपास निर्माण केली गेली. येथील शिलालेखा नुसार ई.स. बौद्ध संघाला सावकारांकडुन देणगी व जमिनी मिळाल्याची नोंद आहे. ऐतिहासिक व पर्यटन या दोन्हि दृष्टिने ही लेणी महत्त्वपूर्ण आहेत. राजा पुलित याच्या नावावरून पाले हे गावाचे नाव रुढ झाले. गांधारपाले हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर (NH 17) महाड शहरा लगत आहे.मुंबई पासून अंतर १७५ कि.मी. डोंगरावर कोरलेली ही लेणी महामार्गाला लागुनच असुन वर जायला पायरी मार्ग आहे.
रचना
ही लेणी गांधारपाले या गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहे. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्यगृह आणि १९ विहार आहेत. पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी सुमारे २०-२५ मिनीटे लागतात.
लेणी क्रमांक १
हे एक चैत्यगृह असून याला सात कमानी आहेत. लेण्याला सहा खांबी ओसरी असून ओसरीच्या मागे भव्य दालन आहे. सहा खांबांपैकी फक्त एकच खांब पूर्णपणे कोरलेला आहे, बाकीचे पाच अर्धवट आहेत. दालनात जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. दालनात उजेड येण्यासाठी दोन खिडक्यांची रचना केलेली आहे. दालनात प्रवेश केल्या नंतर आपल्याला डावीकडच्या भिंतीत चार, तसेच समोरच्या भिंतीत मध्यभागी गर्भगृह आणि गर्भगृहाच्या शेजारी दोन्ही बाजूना दोन दोन खोल्या आहेत. या भव्य दालनाला सर्व बाजूनी ओटा खोदलेला आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी बुद्धमूर्ती तोरणात बसवली आहे. मूर्तीची बरीच नासधूस झालेली आहे. मूर्तीच्या आसनाखाली धम्मचक्र, हरणे, चवरीधारी आणि आकाशात उडणारे यक्ष दिसतात. ही मूर्ती ज्या प्रस्तरात कोरली आहे त्याच्या मागील भागात आसनस्थ बुद्धमूर्तीचा आराखडा दिसतो. मूर्ती खोदण्यापूर्वी तिचे रेखाचित्रे कोरण्याची पद्धत महाराष्ट्रातील कोणत्याही लेण्यात बघावयास मिळत नाही.[२]