कॅरोलाइन लुक्रेशिया हर्षल (१६ मार्च, १७५०:हानोफर, जर्मनी - ९ जानेवारी, १८४८) ही जर्मन खगोलशास्त्रज्ञ होती. हिने ३पी/हर्षल रिगोलेट धूमकेतूसह अनेक धूमकेतू व खगोलीय वस्तूंचा शोध लावला. ही रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक मिळविणारी पहिली महिला होती.
कॅरोलाइन ही विल्यम हर्षलची लहान बहीण होती व त्याच्या सोबत तिने संशोधन केले.