কিষাণ মজদুর প্রজা পার্টি (bn); Кисан маздур праджа парти (ru); किसान मजदूर प्रजा पक्ष (mr); Kisan Mazdoor Praja Party (de); কিষাণ মজদুৰ প্ৰজা পাৰ্টি (as); Kisan Mazdoor Praja Party (en); किसान मजदूर प्रजा पार्टी (hi); కిసాన్ మజ్దూర్ ప్రజా పార్టీ (te); கிசான் மஸ்தூர் பிரஜா கட்சி (ta) parti politique indien (fr); partai politik di India (id); מפלגה בהודו (he); भारत का एक राजनैतिक दल (hi); భారతదేశంలోని రాజకీయ పార్టీ (te); ଭାରତର ଏକ ରାଜନୈତିକ ଦଳ (or); Indian political party (en); حزب سياسي في الهند (ar); Indian political party (en); இந்திய அரசியல் கட்சி (ta) KMPP (en); ఫార్మర్ వర్కర్ పీపుల్స్ పార్టీ (te)
किसान मजदूर प्रजा पक्ष किंवा थोडक्यात प्रजा पार्टी, [१] हा भारताचा एक राजकीय पक्ष होता. १९५१ मध्ये स्थापन झालेल्या हा पक्ष, पुढील वर्षी प्रजा सोशलिस्ट पक्षाची स्थापना करण्यासाठी समाजवादी पक्षात विलीन झाला.[२] पक्षाच्या आंध्र युनिटने मात्र ‘प्रजा पक्ष’ या नावाने जुन्या पक्षाचे पुनरुज्जीवन केले आणि ते आणखी काही वर्षे टिकले.
इतिहास
जून १९५१ मध्ये आचार्य कृपलानी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांनी किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केली. त्याचे दोन नेते, प्रफुल्ल चंद्र घोष आणि तंगुतूरी प्रकाशम, अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि मद्रासचे मुख्यमंत्री होते.[४] याने १९५१-५२ भारतीय सार्वत्रिक निवडणूक लढवली जी भारतातील अशा प्रकारची पहिलीच निवडणूक होती. पक्षाने सोळा राज्यांमधील १४५ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले, परंतु केवळ १० जागा जिंकल्या. सहा उमेदवार मद्रास राज्यातून निवडून आले,[५] आणि म्हैसूर राज्य, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि विंध्य प्रदेश मधून प्रत्येकी एक उमेदवार जिंकून आला.[६][७] एकूण पक्षाला ५.८% मते मिळाली. कृपलानी स्वतः फैजाबाद जिल्हा (उत्तर पश्चिम) मतदारसंघातून पराभूत झाले, परंतु त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी या नवी दिल्लीतून निवडून आल्या. पक्षाने राज्य विधानसभेच्या ७७ जागा जिंकल्या. सप्टेंबर १९५२ मध्ये प्रजा सोशलिस्ट पक्षाची स्थापना करण्यासाठी ते समाजवादी पक्ष (भारत) मध्ये विलीन झाले.[४][८]
१९५३ मध्ये, आंध्र राज्य हे मद्रासपासून वेगळे झाले आणि प्रकाशम यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्याचे मुख्यमंत्रीपद देऊ केले. त्यांनी प्रजा सोशालिस्ट पार्टीपासून फारकत घेतली आणि ‘प्रजा पार्टी’ या नावाने जुन्या पक्षाचे पुनरुज्जीवन केले. १९५५ च्या आध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, प्रजा पक्ष आणि कृषिकर लोक पक्ष यांनी कम्युनिस्टांच्या विरोधात संयुक्त आघाडी स्थापन केली आणि बहुमत मिळवले.
संदर्भ
संदर्भग्रंथ