काथळ - द कोर |
---|
संगीत |
मॅथ्यू पुलिकन |
---|
देश |
भारत |
---|
भाषा |
मल्याळम |
---|
प्रदर्शित |
{{{प्रदर्शन तारीख}}} |
---|
काथळ - द कोर २०२३ चा भारतीय मल्याळम-भाषेतील ड्रामा चित्रपट आहे.[१] जिओ बेबी दिग्दर्शित आणि आदर्श सुकुमारन आणि पॉलसन स्कारिया यांनी लिहिलेला. मामट्टी कंपनी निर्मित, या चित्रपटात मामूट्टी आणि ज्योतिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ऑक्टोबर २०२२ मध्ये या चित्रपटाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आणि त्याच महिन्यात मुख्य फोटोग्राफी सुरू झाली, नोव्हेंबर २०२२ मध्ये ती पूर्ण झाली. संगीत मॅथ्यूज पुलिकन यांनी दिले होते. फ्रान्सिस लुईस यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली तर छायाचित्रण सालू के. थॉमस यांनी केले. हे ५४ व्या IFFI भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित करण्यात आले होते.[२]
कथानक
मॅथ्यू देवासीचे त्याची पत्नी (ओमाना), मुलगी (फेनी) आणि वडील (देवासी) असे चार जणांचे कुटुंब असते. त्यांच्या कुटुंबास गावात योग्य असा मान-सन्मान आहे. पीआरपी पक्षासाठी त्यांच्या वडिलांच्या योगदानाबद्दल पक्षातर्फे मॅथ्यू यांना स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. एका संध्याकाळी त्याला कळले की ओमानाने त्याच्याविरुद्ध घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. त्याच्या निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये अडथळा येऊ शकतो असे मॅथ्यू देवासी यांना कळल्यानंतर पत्नीस सामोरे जावे लागते, त्यावर ओमाना म्हणते की तिने दोन महिन्यांपूर्वीच अर्ज केला होता. ते केरळ उच्च न्यायालयात जलद खटला चालवतात, जिथे ओमानाने तिच्या वैवाहिक आणि लैंगिक इच्छा पूर्ण केल्या नसल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती, परंतु याउलट तिने कुटुंब परिपूर्णपणे वाढविले. प्रतिवादी वकील तिला विचारते की त्यांनी त्यांच्या संपूर्ण वीस वर्षांच्या वैवाहिक जीवनात किती वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले, ज्यावर तिने चार उत्तर दिले.
मॅथ्यूचे लग्न झाले तेव्हा त्या वेळच्या कायद्यानुसार ३७७ या कलमांतर्गत समलैंगिकता हा गुन्हा होता त्यामुळे मॅथ्यूच्या पत्नीला गुन्हेगारशी संबंध ठेवण्यास काहीही रस नाही त्यामुळे तिला मॅथ्यूशी मेथी पासून घटस्फोट घ्यायचा आहे असा युक्तिवाद मेथीची पत्नी पत्नीच्या वकिलाने केला. या युक्तीवादावर मॅथ्यूने अशी साक्ष दिली की त्याला थँकन समलैंगिक असल्याची कोणतीही कल्पना नव्हती आणि तो स्वतःही समलैंगिक नाही. जे नंतरच्या चौकशीमध्ये खोटे सिद्ध झाले. शिवाय थँकनने स्वतःही तशी कबुली दिली ज्यामध्ये तो स्वतः ड्रायव्हिंग स्कूल चालवत असल्याचे त्याने सांगितले ज्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये स्त्रिया मोठ्या संख्येने येतात याचे कारणच तो समलिंगी आहे आणि त्यामुळे त्या स्त्रियांना कडून शिकताना सुरक्षित वाटते.
केस पुढे जात असताना, देवासीला प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून बोलावले जाते आणि त्याचा मुलगा लहानपणापासून समलैंगिक होता आणि समाजाकडून लग्नाचा दबाव होता हे स्वीकारले. त्या रात्री, देवासी रडला आणि त्याच्या मुलाच्या आयुष्यातील दुर्घटनेसाठी तो जबाबदार होता हे मान्य करतो. मॅथ्यूने त्याच्या ओमानाची माफी मागितली आणि विनवणी केली की तो जगासमोर समलैंगिक म्हणून समोर येण्यास घाबरत होता. त्यावर ओमाना म्हणते त्या दोघांची सुटका करण्यासाठी तिला घटस्फोट हवा होता, ते दोघे अश्रू ढाळू लागतात. दुसऱ्या दिवशी, घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना, मॅथ्यू एक समलिंगी माणूस म्हणून कबुली देतो आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी पुढे जातो. निवडणुकीत विजयानंतर, मॅथ्यू ओमानासाठी तिच्या एक संभाव्य वरास भेटण्यासाठी त्याच्या जोडीदारासोबत थँकनासोबत जातो.
संदर्भ