एरएशिया (AirAsia) ही आग्नेय आशियाच्यामलेशिया देशामधील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासहआशियामधील अनेक देशांमध्ये उपकंपन्या चालवणाऱ्या एरएशियाद्वारे २२ देशांमधील सुमारे १०० शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.
सरासरी 0.023 अमेरिकन डॉलर प्रति किलोमीटर इतक्या कमी दरात विमानप्रवास उपलब्ध करून देणारी एरएशिया जगातील सर्वात स्वस्त विमानसेवा आहे. नोव्हेंबर १९९६ मध्ये एरएशियाची विमानसेवा चालू झाली. २ डिसेंबर २००१ रोजी ११ दशलक्ष डॉलर्स इतक्या रकमेने कर्जबाजारी झालेली एरएशिया कंपनी मलेशियन उद्योगपती टोनी फर्नांडिस ह्याने १ मलेशियन रिंगिट ह्या किंमतीस विकत घेतली. फर्नांडिसने कंपनीमध्ये मोठ्या सुधारणा घडवून आणल्या व एरएशियाला पुन्हा नफ्याच्या मार्गावर नेले. एरएशियाने मलेशिया एरलाइन्स ह्या प्रतिस्पर्धी कंपनीचे वर्चस्व कमी करण्यासाठी अनेक नवे मार्ग चालू केले व प्रवासदरांमध्ये लक्षणीय घट केली. २००३ साली एरएशियाने आंतरराष्ट्रीय विमानसेवेस प्रारंभ केला.
भारत सरकारने नागरी उड्डाण क्षेत्रामध्ये परकीय थेट गुंतवणूकीस परवानगी दिल्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये एरएशियाने भारतामध्ये विमानसेवा चालू करण्याची प्रक्रिया सुरू केली. १९ फेब्रुवारी २०१३ रोजी एर एशियाचा 49 %, टाटा उद्योगसमूहाचा 30%, आणि टेलेस्ट्रा ट्रेडप्लसचा 21% वाटा असलेली एरएशिया इंडिया नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. बंगळूरच्याकेंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रमुख हब असलेल्या एरएशिया इंडियाच्या विमानसेवेस १२ जून २०१४ रोजी प्रारंभ झाला.
ताफा
एरएशिया कंपनी प्रामुख्याने एरबसचीए३२० ही विमाने वापरते. सध्या १८० प्रवासी क्षमता असलेली एरएशियाची १६९ विमाने कार्यरत आहेत तर ३२२ अतिरिक्त विमानांची मागणी नोंदवण्यात आली आहे.