एच. सी. वर्मा
|
|
पूर्ण नाव | हरीश चंद्र वर्मा |
जन्म |
८ एप्रिल १९५२ दरभंगा, बिहार, भारत
|
निवासस्थान |
दरभंगा
|
राष्ट्रीयत्व |
भारतीय
|
धर्म |
हिंदू
|
कार्यक्षेत्र |
अणू भौतिकशास्त्र
|
कार्यसंस्था |
आय.आय.टी. कानपूर
|
डॉक्टरेटचे मार्गदर्शक |
प्रा. जी. एन. राव
|
ख्याती |
कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स (पुस्तक)
|
पुरस्कार |
* पद्मश्री पुरस्कार (२०२१)
- मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षा पुरस्कार
|
हरीश चंद्र वर्मा (८ एप्रिल, १९५२) तथा एच. सी.वर्मा हे प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (आय.आय.टी. कानपूर)चे प्राध्यापक आहेत. त्यांच्या भौतिकशास्त्रावरच्या पुस्तकांसाठी ते जगभर ओळखले जाते. विशेषतः "कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स" हे त्यांचे पुस्तक प्रचंड लोकप्रिय आहे. वर्मांच्या पुस्तकांनी अनेक विक्रम केले आहेत.
त्यांनी अनेक शालेय, पदवी आणि उच्चपदवी स्तरावरील पाठ्यपुस्तके लिहिली आहेत. यामध्ये भौतिकशास्त्राच्या सर्वात लोकप्रिय आणि सर्वात प्रतिष्ठित दोन खंडांच्या "कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स"चा समावेश आहे. हे पुस्तक जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड इत्यादी उच्चस्तरीय स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
IIT कानपूरच्या कॅम्पसजवळ राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी त्यांनी "शिक्षा सोपान" या सामाजिक संस्थेची सह-स्थापना केली आहे. त्यांनी भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात तरुण मनांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःला झोकून दिले. व्याख्याने आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके आयोजित करून भारतीय विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भौतिकशास्त्राचे शिक्षण लोकप्रिय करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
बिहार राज्यसरकारने त्यांना मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षा पुरस्काराने सन्मानित केले.[१]
एच.सी. वर्मा यांना २०२१ मध्ये भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[२][३]
संदर्भ आणि नोंदी