ब्रिटिश भारतातील एका गावात कालीदेवतेची पूजा करणाऱ्या ठगी पंथाने थरथराट माजवलेला आहे. बाल गुलामगिरी, काळी जादू आणि नरबळी देणाऱ्या या टोळक्यापासून वाचविण्यासाठी गावकरी इंडियाना जोन्सला साकडे घालतात व तो ठगांचे ठाणे नेस्तनाबूद करून तेथील लहान मुलांना सोडवतो.
वाद
या चित्रपटातील भारताचे चित्रण वादग्रस्त ठरले. भारतात चित्रपटावर तात्पुरती बंदी घातल्याने हा चित्रपट येथील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. कालांतराने हा चित्रपट व्हिडीयो वर प्रदर्शित झाला. [२][३][४]
चित्रपटात दाखविलेले भारतीय खाद्यपदार्थांवरून टीकेचे वादळ उठले होते. चित्रपटातील भारतीय माणसे सापाची पिल्ले, डोळ्यांचे सूप, किडे आणि माकडाचा मेंदू खाताना दाखवले आहेत. हे पाहून भारतात असेच खाणे प्रचलित आहे असे अनेक ठिकाणी शिकवत जात असल्याचे दिसून आले.[३][५] याशिवाय चित्रपटातील व्हाइट सेव्हियर कथानकाबद्दलही टीका झाली. भारतातील गरीब बिचारी जनतेला गोरा नायक अचानक येउन त्यांचा तारणहार ठरतो असे दाखविले गेले आहे.[६]