लुकासफिल्म लि. (इंग्रजी: Lucasfilm Ltd. LLC) ही एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन निर्मिती कंपनी आहे, जिची स्थापना निर्माता जॉर्ज लुकास यांनी १९७१ मध्ये सॅन राफेल, कॅलिफोर्निया येथे केली होती. कंपनीचे बहुतांश कामकाज 2005 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे हलविण्यात आले होते. [२] २०१२ पासून ही कंपनी वॉल्ट डिझ्नी स्टुडिओची उपकंपनी आहे आणि ती स्टार वॉर्स आणि इंडियाना जोन्स फ्रँचायझी तयार करण्यासाठी तसेच चित्रपटांसाठी स्पेशल इफेक्ट्स, ध्वनी आणि संगणक अॅनिमेशन विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
स्टार वॉर्स: एपिसोड १ (१९९९), स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स (२०१५), रोग वन: अ स्टार वॉर्स स्टोरी (२०१६), स्टार वॉर्स: द लास्ट जेडी (२०१७) आणि स्टार वॉर्स: द राइज ऑफ स्कायवॉकर (२०१९) हे कंपनीचे चित्रपट सर्व काळातील सर्वाधिक कमाई करणार्या ५० चित्रपटांपैकी आहेत. यापैकी द फोर्स अवेकन्स हा युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी डिझ्नीने लुकासफिल्म कंपनी रोख $४.०५ अब्जांमध्ये आणि $१.८५५ अब्ज स्टॉक मध्ये विकत घेतली. [३][४][५][६]