इंडिया टुडे हे लिव्हिंग मीडिया इंडिया लिमिटेडने प्रकाशित केलेले भारतीय इंग्रजी भाषेतील साप्ताहिक आहे.[३][४] जवळपास ८ दशलक्ष वाचकसंख्या असलेले हे भारतातील सर्वाधिक प्रसारित होणारे साप्ताहिक आहे.[५] इस २०१४ मध्ये, इंडिया टुडे ने DailyO नावाची एक नवीन ऑनलाइन मत-केंद्रित साइट लाँच केली होती.[६]
इतिहास
इंडिया टुडे ची स्थापना १९७५ मध्ये विद्या विलास पुरी (थॉम्पसन प्रेसचे मालक)[७] यांनी केली होती. त्यांची मुलगी मधू त्रेहान ह्या संपादक आणि त्यांचा मुलगा अरुण पुरी हे त्याचे प्रकाशक होते.[८][९] सध्या, इंडिया टुडे हिंदी, तमिळ, मल्याळम आणि तेलुगूमध्ये देखील प्रकाशित केले जाते. याच सोबत इंडिया टुडे वृत्तवाहिनी २२ मे २०१५ रोजी सुरू झाली.
संदर्भ
बाह्य दुवे