इंग्लिश यादवी युद्ध

 

इंग्लिश यादवी युद्ध १६४२ ते १६५१ दरम्यान इंग्लिश राजे आणि संसद यांच्यातील लढायांची मालिका होती. यात १६४२ चेपहिले इंग्लिश यादवी युद्ध आणि दुसरे इंग्लिश यादवी युद्ध यांचा समावेश होता. याशिवाय १६५०-५२ दरम्यानच्या अँग्लो-स्कॉटिश युद्धाला कधीकधी तिसरे इंग्लिश यादवी युद्ध समजले जाते.

पहिले इंग्लिश यादवी युद्ध प्रामुख्याने संसद आणि चार्ल्स पहिला यांच्यातील सत्तावाटपावरून लढले गेले. जून १६४६ मध्ये राजेशाहीचा पराभव झाला आणि चार्ल्स कैदी झाला.

या विजयानंतर संसदेच्या नेत्यांमध्ये राजाशी करावयाच्या समझोत्याच्या मुद्द्यांवरून मतभेद झाले. बहुसंख्य संसदीय नेते संसदेला सरकारमध्ये सत्ता मिळण्यासाठी युद्धात उतरले होते. राजाला पदच्युत करण्याचा किंवा राजेशाही मोडून काढण्याचा त्यांचा हेतू नव्हता. चार्ल्सने संसदेच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्यावर या तीनही पक्षांची कोंडी झाली. ऑलिव्हर क्रॉमवेल सारख्या कट्टर मतांच्या लोकांचा राजकीय प्रभाव बळकट होउन अधिक अस्थैर्य निर्माण होण्याचे टाळण्यासाठी मवाळ संसदीय नेते आणि राजधार्जिण्यांमध्ये युती झाली. यातून १६४८ चे दुसरे यादवी युद्ध सुरू झाले. यात राजेशाहीचा पराभव झाला आणि जानेवारी १६४९ मध्ये पहिल्या चार्ल्सचा वध करण्यात आला. यावेळी कॉमनवेल्थ ऑफ इंग्लंडची स्थापना झाली.

१६५० मध्ये, दुसऱ्या चार्ल्सचा स्कॉटलंडचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. त्या बदल्यात त्याने इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन्ही ठिकाणी प्रेस्बिटेरियन चर्च तयार करण्याचे मान्य केले. त्यानंतरचे अँग्लो-स्कॉटिश युद्ध ३ सप्टेंबर, १६५१ रोजी वूस्टर येथे संसदीय विजयाने संपले. आयर्लंड आणि स्कॉटलंड या दोन्ही देशांचा कॉमनवेल्थमध्ये समावेश करण्यात आला आणि त्यानुसार ब्रिटन एकात्मक राज्य बनले.

चार्ल्स पहिला
ऑलिव्हर क्रॉमवेल १६५३मध्ये इंग्लंडचा लॉर्ड प्रोटेक्टर झाला

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!