भारतीय संस्कुर्ती ही आपला स्वताचा असा खास वेगळेपणा सांभाळूनही इतरांचे नवनवीन चांगले गेऊन सतत समृद्ध होणारी अशी आहे .त्याचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या परदेशात्याला वनस्पती आज भारतात आपल्याच होऊन राहिलेल्या दिसतात .स्पॅंथोडीया कम्पॅंनुलाटा म्हणजे मराठीत पातरी ,पिचकारी या नावानी संबोधलेला वृक्ष पूर्व आफ्रिकेतील अंगोला देशातून सन १८७३ साली भारतात आणण्यात आला .आज भरयाच राज्यात स्पॅंथोडीया एक शोभिवंत वृक्ष म्हणून लावलेला आडळोतो .मुंबई व आसपासच्या समुद्र किनाऱ्याजवळच्या श्हारामध्ये या झाडांची वाड चांगली होते .समुद्रसपाटी पासून ४५०० फुट उंची पर्यत ही झाडे चांगली वाडतात .मुळात आफ्रिकेतील विषुववृत्तीय भागतील हे झाड जगातील जवळजवळ सर्वे ऊष्ण कटिबंधातील वातावरनात चांगल्या प्रकारे वाढते व फळते .परंतु भारतातील पुणे ,बंगलोर इत्यादी ठिकाणच्या प्रदेशात फुलांचा बहर विरळ असतो पण पालवी दाट असते .सुंदर दिसणारी लालसर ,नारंगी ,किरमिजी रंगाची फुले व हिरवी पालवी अशा रंगसंगतीमुळे या झाडाकडे मन नेहमीच आकषित होते ,मोहून जाते . स्पॅंथोडीया हा मुळात ग्रीक शब्द आहे . . स्पॅंथ म्हणजे ग्रीक भाषेत ढालीच्या आकाराचा . कम्पॅंनुलाटा म्हणजे नरसाळ्याच्या आकाराचा किवा घंटापात्राच्या आकाराचा .हे शब्द फुलाच्या आकाराशी संबधित आहेत .फुलांच्या कळ्या दाबल्यावर पिचकारी किवा फवा–यासारखे पाणी उडते म्हणून त्याला पिचकारी किवा फाऊटन ट्री म्हणून ओळखले जाते .या वृक्ष याची पाने गर्द हिरवी किवा पोपटी रंगाची ,मोठी ,जोड दलाची बनलेली असतात व त्यांना टरटरीत शिरा असतात .कोवळी पालवी मखमली सारखी मृदू आणि कोमल असते कोरड्या प्रदेशात फेब्रुवारीच्या सुमारास या झाडांची पाने गळून उन्हाळ्यात नवीन पालवी फुटते .फेब्रुवारी –मार्च मध्ये झाडावर फुलांचा बहार आल्यावर किरमिजी ,नारगी किवा शेद्री फुलांनी झाड बहरून जाते .भोगलिक परीस्थिती व हवामानानुसार फुलण्याचा मोसम वेगळा असतो .मुंबईत हा वृक्ष फेब्रुवारी ते एप्रिल मध्ये बहरतो ,तर पुण्यात फुलण्याचा मोसम नोव्हेंबर –डिसेंबर मध्ये पहाव्यास मिळतो .