आनंद विहार टर्मिनस रेल्वे स्थानक हे भारताच्यादिल्ली शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्लीच्या पूर्व भागातील आनंद विहार उपनगरात स्थित असलेले हे स्थानक २००९ साली तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आले. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी ह्या स्थानकाचे प्रयोजन करण्यात आले होते. ह्या स्थानकाची प्रमुख इमारत नवी मुंबईच्यावाशी रेल्वे स्थानकावरून प्रेरणा घेऊन रचण्यात आली आहे. आजच्या घडीला आनंद विहार टर्मिनसहून दर आठवड्याला ५० लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. प्रामुख्याने दिल्लीच्या पूर्वेकडील उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्चिम बंगाल व ईशान्य भारताकडे धावणाऱ्या गाड्या येथून सुटतात.
आनंद विहार टर्मिनस मेट्रो स्थानक दिल्ली मेट्रोच्यानिळ्या मार्गिकेवर आहे. तसेच स्वामी विवेकानंद आंतरराज्यीय बस स्थानक येथून जवळच असल्यामुळे ज्यामुळे प्रवाशांना ह्या स्थानकापर्यंत पोचणे सुलभ होते.