सामाजिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते जाती-वर्ग, सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स (टीपीडीआर)चे ते सरचिटणीस आहेत. तसेच अखिल भारतीय फोरम फॉर राईट टू एज्युकेशनचे ते प्रेसिडियम सदस्य आहेत.[२]
तेलतुंबडे यांचा विवाह रमाबाई आंबेडकर यांच्याशी झालेला असून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात व यशवंत आंबेडकर यांच्या मुलगी आहेत. प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर हे तेलतुंबडेंचे मेहुणे आहेत. प्राची व रश्मी या रमाबाई व आनंद तेलतुंबडे यांच्या मुली आहेत.
ते नक्षली नेता तथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांचे मोठे भाऊ आहेत.[४][५] मिलिंद तेलतुंबडे हे २०१८ च्या भीमा कोरेगाव हिंसाचाराचा मुख्य फायनान्सर होते. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मर्दिनटोला जंगल परिसरात महाराष्ट्र पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांमध्ये तेलतुंबडे यांचा समावेश होता.[६] ते एकूण ६३ गुन्ह्यांमधील फरारी आरोपी होते[७]
नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याचा आरोप
पुणे येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतरकोरेगाव भिमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी दलित-बौद्धांविरूद्ध हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या तपासात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना अटक करून कारवाई केली होती. मात्र पुणे सत्र न्यायालयाने या कारवाईला स्थगित करण्याचा आदेश दिला आहे.[८][९]
पुरस्कार व सन्मान
जानेवारी २०२४ मध्ये, तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारने बसव पुरस्काराने सन्मानित केले.[१०][११][१२]