अमेरिकन कमळ किंवा नेलुम्बो ल्युटिया ही नेलंबोनेसी कुटुंबातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे. सामान्य नावांमध्ये अमेरिकन कमळ, पिवळे कमळ, वॉटर-चिनक्वापिन आणि व्होले यांचा समावेश होतो. हे कमळ मूळचे उत्तर अमेरिकेचे आहे. या वनस्पतिचे सध्याचे जीवशास्त्रीय नाव Nelumbo lutea Willd असे आहे. पूर्वी हिचे वर्गीकरण Nelumbium luteum आणि Nelumbo pentapetala, आणि इतर नावाने केले गेले होते.
वर्णन
अमेरिकन कमळ ही एक उदयोन्मुख जलचर वनस्पती आहे. ही वनस्पती तलाव आणि दलदलीत तसेच पुराच्या अधीन असलेल्या भागात वाढते. याची मुळे खोल चिखलात रुजलेली असतात, तर पाने आणि फुले पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. पाने २ मी (६.६ फूट) पर्यंत पाण्याच्या पृष्ठभागापासून उंच वाढू शकतात. तर व्यासाच्या पानाचा गोल घेरा ३३–४३ सेंमी (१३–१७ इंच) असू शकतो. पूर्णवाढ झालेल्या वनस्पतींची उंची ०.८ ते १.५ मी (२.६ ते ४.९ फूट) पर्यंत असते.[१]
याच्या उमलण्याची सुरुवात वसंत ऋतूच्या उत्तरार्धात होते आणि उन्हाळ्यात देखील याचे उमलने चालू राहू शकते. याच्या जीवशास्त्रीय नावाचा अर्थ लॅटिनमध्ये "पिवळा" (फुल) असा होतो. फुले पांढरे ते फिकट पिवळे असू शकतात. फुले १८–२८ सेंमी (७.१–११ इंच) व्यासाचे असू शकतात आणि त्यांना २२ ते ३५ पाकळ्या येतात.[१]
अमेरिकन कमळ ही, ऑस्ट्रिनिया पेनिटालिसची मूळ प्रजातीची वनस्पती आहे.[२]
तथापि, निवासस्थानाचा नाश झाल्यामुळे नेलुम्बो ल्युटियाची संख्या अमेरिका खंडात कमी होत आहे. हे कमळ न्यू जर्सी, मिशिगन आणि पेनसिल्व्हेनियामध्ये धोक्याच्या वर्गात नोंदवले गेले आहेत तर डेलावेअरमध्ये संपुष्टात आले आहे.[३] तशी या प्रजातीत अनुवांशिक विविधता कमी आहे त्यामुळे याचा प्रसार कमी झाला.[४]
वरवर पाहता ही प्रजाती अमेरिकेत उत्तरेकडे मूलनिवासी अमेरिकन लोकांद्वारे वितरित केली गेली होती जे अन्नाचा एक स्रोत म्हणून त्यांच्यासोबत ही वनस्पती घेऊन गेले होते.[५]
उपयोग
या वनस्पतीमध्ये एक मोठा कंदयुक्त राइझोम आहे जो अन्नाचा एक स्रोत म्हणून देखील वापरला जातो.[६] याचे बीज देखील खाण्यायोग्य आहे जे अमेरिकेत "ॲलिगेटर कॉर्न" म्हणून ओळखले जाते.[७] बियाणे युक्त फळे देखील खाल्ली जातात.[८] याची कोवळी, न उघडलेली पाने आणि कोवळे देठ शिजवले आणि खाल्ले जातात.[९]
विविध तलावांमध्ये या प्रजातीची फुलांसाठी लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. अमेरिकन कमळ रेंगाळणारे कंद आणि बिया द्वारे आजूबाजूला पसरते. अमेरिकन कमळ आणि भारतीय कमळयांचा संकर करून विविध संकरित प्रजाती निर्माण करण्यात आल्या आहेत. बियाण्यांच्या टोकदार बाजूला खडबडीत पृष्ठभागावर किंवा सँड पेपर वर किंवा कानसच्या सहाय्याने थोडे घासून नंतर पाण्यात भिजवून याद्वारे नवीन वनस्पतींची निर्मिती केली जाते. प्रस्थापित वनस्पतींचे मूळखोड विभाजन करून देखील प्रसार केला जातो.
इतर माध्यम
डिस्नेचे पात्र राजकुमारी टियाना तिचा प्रतिष्ठित पोशाख म्हणून जे वस्त्र परिधान करते, तो एक पिवळ्या नेलुम्बो लुटेयापासून तयार केलेला गाऊन आहे.
^Niering, William A.; Olmstead, Nancy C. (1985) [1979]. The Audubon Society Field Guide to North American Wildflowers, Eastern Region. Knopf. p. 637. ISBN0-394-50432-1.