अनिल बाबुराव गव्हाणे |
---|
अनिल बाबुराव गव्हाणे |
जन्म नाव |
अनिल बाबुराव गव्हाणे |
---|
टोपणनाव |
बापू, (शेती मातीचे कवी) |
---|
जन्म |
५ डिसेंबर १९६४ बार्शी, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र |
---|
शिक्षण |
बी.ए. |
---|
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
---|
कार्यक्षेत्र |
साहित्य, कविता, कथा, एकांकिका |
---|
साहित्य प्रकार |
कविता, कथा, एकांकिका |
---|
प्रसिद्ध साहित्यकृती |
बळीराजा (कवितासंग्रह), भुईच्या वेदनेचे पुरावे (कवितासंग्रह) |
---|
वडील |
बाबुराव बळीराम गव्हाणे |
---|
आई |
कालिंदी बाबुराव गव्हाणे |
---|
पत्नी |
शालन अनिलराव गव्हाणे |
---|
अपत्ये |
अमरसिंह, अंजली, शुभांगी |
---|
पुरस्कार |
राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार (२०१९) लोक शाहिर आण्णाभाऊ साठे पुरस्कार (२०२१) |
---|
अनिल बाबुराव गव्हाणे ( ५ डिसेंबर १९६४) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यात त्यांचे बोरगाव (बु.) हे गाव होय. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचे बळीराजा आणि भुईच्या वेदनेचे पुरावे हे कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या किशोर मासिकातूनही प्रसिद्ध झाल्या आहेत.[१] आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आदी केंद्रांवरून गव्हाणे यांचे काव्यवाचन व मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.[ संदर्भ हवा ]
त्यांच्या बळीराजा कवितासंग्रहातील कुणबी माझा ही कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दुसऱ्या वर्गात जून २०१४ पासून शिकवली जाते.[२]
ते मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचे आजीव सभासद आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांना राज्यस्तरीय यशवंत रत्न (२०१९) तसेच लोक शाहिर आण्णाभाऊ साठे पुरस्कार (२०२१) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[ संदर्भ हवा ]
संदर्भ