या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
जानेवारी २०१८ मध्ये त्यांची मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, ज्या दरम्यान त्यांनी दोन प्रमुख लष्करी ऑपरेशन्सच्या अंमलबजावणीवर देखरेख केली : २०१९ चा पाकिस्तानविरुद्ध बालाकोट हवाई हल्ला (एर स्ट्राइक) आणि ऑपरेशन सनराईज - भारत-म्यानमार यांचा बंडखोरी विरुद्ध एक संयुक्त स्ट्राइक. [७]
सप्टेंबर २०१९ मध्ये, अनिल चौहान यांची पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (GOC-in-C) म्हणून नियुक्ती करण्यात आली; तेव्हा त्यांचे पूर्ववर्ती मनोज मुकुंद नरवणे, तत्कालीन लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मे २०२१ मधील त्यांच्या निवृत्तीपर्यंत चौहान या पदावर कार्यरत होते. [८][९] सक्रिय लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर चौहान यांनी अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) चे लष्करी सल्लागार म्हणून काम केले. [७]
२८ सप्टेंबर २०२२ रोजी, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने अनिल चौहान यांची द्वितीय भारतीय संरक्षण दलप्रमुख (CDS) म्हणून नियुक्ती केली. चतुर्थ तारांकित हुद्द्यावर नियुक्त केलेले ते पहिले तृतीय तारांकित सेवानिवृत्त अधिकारी आहेत. [७] अनिल चौहान यांनी जनरल बिपिन रावत यांच्यानंतर पदभार स्वीकारला, ज्यांचे नऊ महिन्यांपूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. [१०]