अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट: काउंट रपर्स्पेक्टीव्ह्स फ्रॉम द मार्जिन्स[१] हे पुस्तक शैल मायारामने[२] (दिल्लीतील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपींग सोसायटी[३] मध्ये अभ्यागत वरिष्ठ संशोधक आहेत) लिहिलेले असून भारतात पर्मंनंट ब्लॅक या प्रकाशन संस्थेद्वारे २००४ मध्ये प्रकाशित झाले.
मुख्य युक्तिवाद
अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट या पुस्तकामध्ये परंपरागत दक्षिण आशिआई लेखनशास्त्राचे सबार्ल्टन परीप्रेक्षेतून मुल्यांकन करून हिंदुत्व, इस्लाम व भारतराज्य यांच्यातील गुंतागुंतीवर भर टाकला आहे. मेयो समुदायाच्या मौखिक परंपरेतून आलेल्या गाणी आणि गोष्टींचे वर्णन करून मायारामशेल हे डोळ्या समोर उभा राहणारा इतिहास आणि स्मृती यांच्या मधला विरोधाभास तपासतात. त्यांची वांशिक ओळख कायमची सोडून द्यावी यासाठी बऱ्याच शतकापासून झेललेले आव्हान ते पर्यायी इतिहासातून सांगतात. हे पुस्तक मेयोंच्या विचारकरण्याच्या पद्धती, वर्तन, त्यांचे जगणे, प्रतिकार करणे, विसरणे, लक्षात ठेवणे या विषयी आहे. यामधून राज्याची विविध स्वरूपे आणि त्याच्याशी संलग्न असणारी लोकलेखा पद्धती आणि इतिहास यांची ग्रंथातील चर्चाविश्वे यांचे समालोचन करण्याचा प्रयत्न आहे. मेओंच्या मिथक परंपरेतून त्यांच्या मधील घडामोडी, प्रवर्ग आणि सत्तेची उतंरड हे अंतर्गत विश्व समजण्यास मदत होते. जे इस्लाम आणि हिंदू धर्मातील परंपरांवर आधारलेल्या ज्या सत्ताधारी जाती त्यांच्या निगडीत असणाऱ्या चालीरीतींशी सबंधित आहेत. मियो समुदायाच्या मौखिक परंपरा, सामुदायिक स्मृती जतन करण्याच्या पद्धती व स्वतःची शासन पद्धती यावरआधारलेल्या काही दशंकाच्या गहन संशोधनावरचा हा अभ्यास आहे.[४]
सारांश
पूर्वभारतातील मेयो हे दक्षिण आशियातील जास्त लोकसंख्या असलेले असून ज्यांनी ब्रिटिश युगामध्ये आठव्या शतकात अरब विजयामुळे दुःख सहन केले. मेयोनी राज्य निर्माण केले नाही तर जिथे सतत नोकरशाही आणि राजकीय सत्ताधारी यांच्या विविध नियमांमुळे ते परीघावर फेकेले गेले मात्र समतेच्या मतांसाठी त्यांनी यशस्वी प्रतिकार केला. या प्रतिकाराची परंपरागत गाणी अथवा गोष्टी नसल्यामुळे त्याची नोंदकुठे ही नाही. इतिहास अथवा नोंदी या राज्यकर्ते व सत्ताधारी यानी लिहिल्या ज्यामध्ये या प्रतिकाराला आणि स्वायतत्तेला कलंकित समजले गेले इतकच नाही तर त्यांचे वांशिक पूर्वग्रह हे इतिहासातील सत्यात रूपांतर करताना त्यांना गुन्हेगार समजल गेले. ही स्वतंत्रमौखिक परंपरेमुळे ते बऱ्याच गोष्टीचे आव्हान पेलू शकले जसे शतकानुशतके होणारी राज्यनिर्मिती, नाकलनीय घटना, कथा आणि त्यांची रचलेली आणि पुनर्रचित ओळखयांची प्रक्रिया आणि वगळली गेलेली सामाजिक जात. पूर्ण प्रकरणामध्ये लेखका ने मेओंचे परिघाबाहेर फेकेले जाण्याची प्रक्रिया, प्रशासकीय दस्ताऐवज, समुदायाची संस्कृतीची स्वरूपे आणि ऐतिहासिक पुस्तके आणि स्वतः परिघाबाहेर फेकले जाण्याचा प्रतिपरिप्रेक्ष असणाऱ्या मौखिक परंपरेच्या पद्धती यांचा तपशील दिला आहे.
संदर्भ सूची