Ana Bolena (es); Anne Boleyn (is); Anne Boleyn (ms); Ан Болейн (bg); Anne Boleyn (tr); Anna Boleynová (sk); Анна Болейн (uk); Anne Boleyn (ig); Anne Boleyn (mul); Anne Boleyn (gsw); Anne Boleyn (uz); Anne Boleyn (eo); Ана Болејн (mk); Anne Boleyn (bs); Anne Boleyn (gv); অ্যান বোলিন (bn); Anne Boleyn (fr); Ana Boleyn (hr); אן באלין (yi); अॅन बुलिन (mr); Anne Boleyn (vi); ენ ბოლეინი (xmf); Anna Boleyn (af); Ана Болен (sr); Ana Bolena (pt-br); Anne Boleyn (lb); Anne Boleyn (nn); Anne Boleyn (nb); Anna Boleyn (az); ಅನ್ನಿ ಬೊಲಿನ್ (kn); ئان بۆڵن (ckb); Anne Boleyn (en); آن بولين (ar); Anne Boleyn (br); Boleyn Anna (hu); ऐनी बोलिन (mai); Anna Boleina (lv); Ana Bolena (eu); Anna Boleynová (cs); Ana Bolena (ast); آن بولین (azb); Anne Boleyn (oc); Ann Boleyn (cy); Anne Boleyn (da); Anne Boleyn (ga); Աննա Բոլեյն (hy); 安妮·博林 (zh); Anna Boleyn (fy); ენ ბოლეინი (ka); アン・ブーリン (ja); Anne Boleyn (ia); آن بولین (fa); ان بولين (arz); Ганна Балейн (be); אן בולין (he); Anna Bolena (la); Ana Bolena (mwl); ऐनी बोलिन (hi); 安妮·博林 (wuu); Anna Boleyn (fi); Աննա Բոլեյն (hyw); Anna Boleyn (li); Anna Boleyn (nl); ஆன் பொலின் (ta); Anna Bolena (it); Anne Boleyn (dtp); Anne Boleyn (sv); Anna Boleyn (pl); Anne Boleyn (et); Anne Boleyn (id); Anne Boleyn (nds); Anne Boleyn (de); Anna Bolena (ca); ඈන් බුලින් (si); Anne Boleyn (sh); Ana Bolena (pt); Anne Bullen (ang); Anne Boleyn (ro); Анна Болейн (ru); Ana Bolein (lt); Anne Boleyn (sl); Anne Boleyn (tl); Anne Boleyn (sq); Ана Болен (sr-ec); Anne Boleyn (war); Anne Boleyn (sw); ആൻ ബുലിൻ (ml); 安妮·博林 (zh-tw); แอนน์ บุลิน พระราชินีแห่งอังกฤษ (th); Болейн Анна (cv); این بولین (pnb); అన్నే బోలీన్ (te); Ana Bolena (gl); 앤 불린 (ko); Άννα Μπολέυν (el); Anne Boleyn (xh) reina consorte de Inglaterra (1533-1536) (es); angol királyné (hu); Drottning Englands og önnur eiginkona Hinriks 8. (1501-1536) (is); política británica (1501–1536) (ast); reina consort d'Anglaterra com a segona esposa d'Enric VIII, mare de la reina Elisabet I (ca); ail wraig Harri VIII, brenin Lloegr (cy); مادر ملکه الیزابت اول و همسر دوم هنری هشتم انگلستان (fa); İngiltere Kralı VIII. Henry'nin ikinci eşi (tr); イングランド王ヘンリー8世の2番目の王妃、エリザベス1世の生母(1501頃-1536) (ja); secunde sposa de Henrico VIII de Angleterra (ia); Druhá manželka kráľa Henricha VIII (sk); אשתו השנייה של הנרי השמיני, ואמה של אליזבת הראשונה, מלכת אנגליה (he); nwunye nke abụọ Henry nke Asatọ nke England (ig); Englannin kuninkaan Henrik VIII:n toinen vaimo (fi); dua edzino de Henriko la 8-a, reĝo de Anglio; patrino de Elizabeto la 1-a, reĝino de Anglio (eo); Druhá manželka Henricha VIII (cs); druga supruga engleskog kralja Henrika VIII, te majka engleske kraljice Elizabete I (bs); regina consorte d'Inghilterra e Irlanda, seconda moglie di Enrico VIII Tudor (it); ইংল্যান্ডের রাজা অষ্টম হেনরির দ্বিতীয় স্ত্রী (bn); reine d'Angleterre (1533-1536) (fr); inglismaa kuninganna 1533–1536 (et); second wife of Henry VIII of England (en); rainha consorte da Inglaterra (1533–1536) (pt); друга супруга енглеског краља Хенрија VIII Тјудора (sr); drottning av England 1533–1536 (sv); друга супруга енглеског краља Хенрија VIII Тјудора (sr-ec); zweite der sechs Ehefrauen König Heinrichs VIII., Mutter von Elisabeth I. (ca. 1501-1536) (de); istri dari Raja Henry VIII (id); królowa Anglii i Irlandii (pl); Henrik VIIIs andre hustru og mor til dronning Elizabeth I (nb); 英王亨利八世第二個王后,伊麗莎白一世的生母 (zh-tw); вторая супруга короля Англии Генриха VIII, мать королевы Англии Елизаветы I (ru); tweede vrouw van Hendrik VIII van Engeland (nl); 영국 헨리 8세의 두 번째 부인 (ko); королева-консорт Англії (uk); second wife of Henry VIII of England (en); زوجة ملك إنجلترا هنري الثامن (ar); δεύτερη σύζυγος του Ερρίκου Η΄ της Αγγλίας και μητέρα της βασίλισσας Ελισάβετ Α΄ της Αγγλίας (el); y nah ven heshee ec Inry VIII Hostyn (gv) Ana Berlana, Catalina Carey, Anne Boleyn (es); Anne Boleyn (ca); Anna Boleyn (de); ان بولین (fa); 安寶琳, 安妮·布林, 安妮.博林, 安·波林 (zh); Anna Boleyn, Ana Boleyn (ro); Boleyn Anne, Boleyn, Anna Boleyn, Anne Bolyen (sv); אן בולן, המרקיז מפמברוק, מרקיז פמברוק, המרקיזה מפמברוק, אן בוליין (he); Lady Anne Boleyn, Queen Anne of England, Anne, Queen consort of England, Queen Anne Boleyn of England, Anna de Boullan, Anne Boullan, Anne Boleyn, Marquess of Pembroke, Anne Bullen, Anna Bolina (ig); Anna Boley, Anne Boley, Anne Boleyn (fi); Anno Boleyn (eo); Anne Boleyn (cs); Ana Boleyn, Ana Bolen, Anne Bullen, Anne Bulen (bs); Anne Boleyn (it); Lady Anne Boleyn (dtp); Anna Boleyn (et); ऍन बोलेन, अॅन बुलिन (mr); Anne boleyn, Ana Boleyn, Anne Bolena (pt); Boleina (lv); Anne Boleyn (af); Ен Булин, Ана Болин, Anne Boleyn, Ен Болин, Ана Болина, Ана Болејн, Anna Bolina (sr); அஏன் பொலின், ஆன் போலீன் (ta); Болейн Анна, Анна Булін (uk); Anne Boleyn, Anne Bolena, Ana Boleyn (pt-br); 앤 볼레인, 앤 볼린 (ko); แอนน์ โบลีน สมเด็จพระราชินีแห่งอังกฤษ, สมเด็จพระราชินีแอนน์ โบลีน, แอน โบลีน, แอนน์ โบลีน, Anne Boleyn (th); Anne Boleyn (cy); Anna Boleyn (nb); Anna Bolein, Anne Boleyn (nl); Ana Bolen (sh); Anne Boleyn (sk); Болейн Анна, Болейн А. (ru); Ana Engleska, Anne Boleyn (hr); Lady Anne Boleyn, Queen Anne of England, Anne, Queen consort of England, Queen Anne Boleyn of England, Anna de Boullan, Anne Boullan, Anne Boleyn, Marquess of Pembroke, Anne Bullen, Anna Bolina (en); Ана Болейн (bg); Άννα Μπόλεϋν, Άννα Μπολέιν, Άννα Μπολέϋν (el); Anna Bolina, Anna Boleyn (la)
अॅन बुलिन (इंग्लिश: Anne Boleyn ;) (इ.स. १५०१/इ.स. १५०७ - मे १९, इ.स. १५३६) ही इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याची द्वितीय पत्नी व पहिली एलिझाबेथ हिची आई होती. तसेच ती पेंब्रोकाची पहिली मार्क्वेस असून तिच्या वंशजांनाही तो अधिकार होता. आठव्या हेन्रीचा अॅनेबरोबर झालेला विवाह आणि पुढे तिला देण्यात आलेल्या मृत्युदंडामुळे ती इंग्लिश सुधारणांच्या मुळाशी असलेल्या राजकीय आणि धार्मिक उठावांतील महत्त्वाची व्यक्तिरेखा ठरली.
जीवन
अॅन ही विल्टशर परगण्याचा पहिला अर्ल थॉमस बुलिन आणि विल्टशराची काउंटेस एलिझाबेथ बुलिन या दांपत्याची मुलगी होती. क्लोद ऑफ फ्रान्साची 'मेड ऑफ ऑनर' म्हणून तिचे शिक्षण नेदरलंड्स् व फ्रान्स येथे झाले. इ.स. १५२२ सालच्या सुरुवातीला अॅन इंग्लंडास परतली. तिच्या नात्यातील ऑर्मंडाचा ९वा अर्ल जेम्स बटलर याच्याशी तिचे लग्न होणार होते. परंतु, हा विवाहसंबंध फिसकटला व अॅन आठव्या हेन्रीची राणी अरागॉनची कॅथरीन हिच्या सेवेत 'मेड ऑफ ऑनर' म्हणून रुजू झाली.
इ.स. १५२५च्या सुमारास आठव्या हेन्रीला तिची भूल पडली आणि त्याने तिचा अनुनय सुरू केला. सुरुवातीला त्याच्या तिला मोहवण्याच्या प्रयत्नांना तसेच आपली बहीण मेरी हिच्याप्रमाणे त्याचे अंगवस्त्र बनण्याच्या प्रस्तावाला तिने धुडकावून लावले. आठव्या हेन्रीची तिच्याशी लग्न करण्याचा विचार आत्यंतिक बळावल्याने त्याने राणी कॅथरिनेशी घटस्फोट घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र पोप तिसरा क्लेमंट या गोष्टीला परवानगी देणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर इंग्लंडातली कॅथलिक चर्चाची सत्ता मोडकळीस आणण्याच्या घडामोडी सुरू झाल्या.
अॅनेचे प्रस्थ आठव्या हेन्रीच्या लेखी वाढायला लागल्यावर त्याचा मुख्यमंत्री, यॉर्काचा आर्चबिशप थॉमस वूल्झे याची रवानगी अॅनेच्या सांगण्यावरून त्याच्या मूळ प्रांतात करण्यात आली. इ.स. १५३२ साली आठव्या हेन्रीने तिला महत्त्वाची पदे देऊ केली. बुलिन घराण्याचा पुरोहित, थॉमस क्रॅन्मर याला कॅंटरबरीचा आर्चबिशप नेमण्यात आले. जानेवारी २५, इ.स. १५३३ साली हेन्री आणि अॅन विवाहबद्ध झाले. मे २३, इ.स. १५३३ रोजी क्रॅन्मराने हेन्री आणि कॅथरिनेचा विवाहविच्छेद झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पाचच दिवसांत त्याने अॅन व हेन्रीचा विवाह धर्मसंमत असल्याची द्वाही फिरवली. यानंतर लगेचच, पोपाने हेन्री व क्रॅन्मराला धर्मबहिष्कृत करण्याची शिक्षा जाहीर केली. या घटनेमुळे पहिल्यांदाच इंग्लंडातले चर्च व रोमातली धर्मसत्ता यांच्यातील संबंधांना तडे गेले व आठव्या हेन्रीने इंग्लंडातील चर्च स्वतःच्या आधिपत्याखाली आणले.
जून १, इ.स. १५३३ रोजी अॅनेचा इंग्लंडाची राणी म्हणून राज्याभिषेक झाला. त्याच वर्षी, सप्टेंबर ७ रोजी तिने इंग्लंडाची भावी राणी पहिली एलिझाबेथ हिला जन्म दिला. राज्याला वारस म्हणून तिने मुलास जन्म न दिल्याने हेन्री काहीसा नाराज झाला तरी त्याला मुलाची आशा होती व एलिझाबेथेवर त्याचे प्रेम होते. यानंतर तीनदा अॅनेचा गर्भपात झाला आणि त्याच सुमारास हेन्री जेन सीमोर हिच्यावर भाळला होता. एप्रिल-मे इ.स. १५३६मध्ये हेन्रीने राजद्रोहाच्या आरोपाखाली अॅनेची चौकशी चालवली. मे २ रोजी तिला अटक करून टॉवर ऑफ लंडन येथे ठेवण्यात आले. १५मेला ज्युरींपुढे तिच्यावर खटला चालून ती दोषी असल्याचा निर्वाळा देण्यात आला. टॉवर ग्रीन येथे अवघ्या चारच दिवसांनंतर तिचा शिरच्छेद करण्यात आला. आधुनिक इतिहासकारांच्या मते त्यावेळी तिच्यावर ठेवले गेलेले व्यभिचार व जवळच्या नात्यांत ठेवलेले लैंगिक संबंध हे आरोप अविश्वसनीय होत. तिची मुलगी, एलिझाबेथ ही इंग्लंडाची राणी बनल्यावर अॅनेला हुतात्म्याचा दर्जा मिळाला आणि ती इंग्लिश सुधारणा चळवळीची नायिका मानली जाऊ लागली. शतकानुशतके अनेक कला व सांस्कृतिक आविष्कारांची ती प्रेरणास्थान बनली आहे. तिच्यामुळे आठव्या हेन्रीने राणी कॅथरिनेशी काडीमोड घेतला व रोमातील धर्मसत्तेपासून इंग्लंडातले चर्च वेगळे केले म्हणून ती 'इंग्लंडाची सगळ्यांत महत्त्वाची व प्रभावी राणी' मानली जाते.