२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक आशिया पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २२-२८ नोव्हेंबर २०२१ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२३ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेच्या पात्रतेचा एक भाग सदर स्पर्धा होती. आयसीसीच्या आशिया भागासाठी सदर स्पर्धा खेळविण्यात आली. एकूण सहा देशांनी यात भाग घेतला.
संयुक्त अरब अमिराती महिला ३० धावांनी विजयी. आयसीसी अकादमी मैदान, दुबई पंच: अहसान रझा (पाक) आणि दुर्गा सुबेदी (ने) सामनावीर: तीर्था सतीश (संयुक्त अरब अमिराती)
नाणेफेक :मलेशिया महिला, क्षेत्ररक्षण.
मलेशियाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
नताशा चेरीयात, प्रियांजली जैन, तीर्था सतीश, खुशी शर्मा आणि सुभा वेंकटरामण (सं.अ.अ.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
संयुक्त अरब अमिराती महिला ११ धावांनी विजयी. आयसीसी अकादमी मैदान, दुबई पंच: विनोद बाबू (ओ) आणि दुर्गा सुबेदी (ने) सामनावीर: छाया मुगल (संयुक्त अरब अमिराती)
संयुक्त अरब अमिराती महिला ४७ धावांनी विजयी. आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई पंच: विनयकुमार झा (ने) आणि अहसान रझा (पाक) सामनावीर: खुशी शर्मा (संयुक्त अरब अमिराती)
नाणेफेक :भूतान महिला, क्षेत्ररक्षण.
संयुक्त अरब अमिराती आणि भूतान यांच्यामधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
संयुक्त अरब अमिरातीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये भूतानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
संयुक्त अरब अमिराती महिला ७ गडी राखून विजयी. आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई पंच: विनोद बाबू (ओ) आणि दुर्गा सुबेदी (ने) सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)