हरिकेन कत्रिना (इंग्लिश भाषा: Hurricane Katrina, कत्रिना वादळ) हे अमेरिकेच्या इतिहासातील कमाल वित्तहानी घडवून आणणारे एक समुद्री वादळ आहे. ऑगस्ट २९ २००५ रोजी ह्या वादळाने अमेरिकेतील लुईझियाना व मिसिसिपी ह्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. ह्या वादळामुळे साधारण १,८३६ बळी गेले, तसेच न्यू ऑर्लिन्स ह्या समुद्रसपाटीखाली वसलेल्या मोठ्या शहराचा ८०% भाग पाण्याखाली गेला.