स्कँडिनेव्हियन एरलाइन्स (स्वीडिश, डॅनिश व नॉर्वेजियन: Scandinavian Airlines) ही स्वीडन, डेन्मार्क व नॉर्वे ह्या देशांची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी व स्कँडिनेव्हिया भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. १ ऑगस्ट १९४६ रोजी स्वीडिश एरलाइन्स, डॅनिश एरलाइन्स व नॉर्वेजियन एरलाइन्स ह्या तीन विमानकंपन्यांनी एकत्र येऊन स्कँडिनेव्हियन एरलाइन्सची निर्मिती केली. स्टार अलायन्स समूहाचा संस्थापक सदस्य असलेली स्कँडिनेव्हियन एरलाइन्स सध्या प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने युरोपातील ९व्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी आहे. स्कँडिनेव्हियन एरलाइन्सचे मुख्यालय स्टॉकहोम महानगरामध्ये असून कोपनहेगन विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ तर ओस्लो विमानतळावर दुसरा व स्टॉकहोम आर्लांडा विमानतळावर तिसरा मोठा वाहतूकतळ आहे.