नॉर्वेजियन ही स्कॅंडिनेव्हियामधीलनॉर्वे देशाची राष्ट्रभाषा आहे. जर्मेनिक भाषासमूहामधील ही भाषाउत्तर युरोपामधीलस्वीडिश व डॅनिश भाषांसोबत पुष्कळशी मिळतीजुळती आहे. नॉर्वेजियन दोन वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये लिहिली जाते. बूक्मोल (Bokmål, पुस्तकी बोली) व नायनोर्स्क (Nynorsk, नवी नॉर्वेजियन) ह्या दोन्ही अधिकृत नॉर्वेजियन भाषा आहेत. २००५ सालच्या एका चाचणीनुसार येथील ८६.३% लोक बूक्मोल, ७.५% लोक नायनोर्स्क तर ५.५% लोक दोन्ही भाषा वापरतात.