सोमनाथ अवघडे मराठी चित्रपट अभिनेता आहे. याने फँड्री या चित्रपटात काम केले आहे.[१] फॅन्ड्री चित्रपटातील 'जब्या' या भूमिकेसाठी त्यांला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.[२]
प्रारंभिक जीवन आणि कुटुंब
सोमनाथ अवघडे हा केम, करमाळा तालुका, सोलापूर जिल्ह्यातील आहे. त्याच्या कुटुंबात आई वडील मोठा भाऊ रवी आणि बहीण अंबिका आहेत. सोमनाथचे वडील लक्ष्मण अवघडे यांचा व्यवसाय पोतराज व ते हलगीही वाजवतात आणि आई शेतात मोलमजुरी करते.
कारकीर्द
अवघडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात फॅन्ड्री या चित्रपटातून केली आणि या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तो प्रसिद्ध झाला.[३] दिग्दर्शक नागराज मंजुळे हे करमाळ्यातील जेऊर गावचे आहेत. 2011 मध्ये 'पिस्तुल्या' या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानिमित्त केम गावात मंजुळे यांचा सत्कार होणार होता. जेव्हा ते कार्यक्रमाला आले तेव्हा त्यांनी सोमनाथला हलगी वाजवताना पाहिले आणि तिथेच सोमनाथची फॅन्ड्री चित्रपटाचा नायक म्हणून निवड झाली.[४]