नागराज मंजुळे

नागराज मंजुळे
नागराज पोपटराव मंजुळे
जन्म जेऊर, सोलापूर, महाराष्ट्र, भारत
अधिकृत संकेतस्थळ www.nagrajmanjule.net

नागराज पोपटराव मंजुळे हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, आणि मराठी कवी आहेत. ते "पिस्तुल्या"[] या लघुपटाचे आणि फॅंड्री, सैराट, व झुंड या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.

व्यक्तिगत जीवन

हे सोलापूर जिल्हयातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे आहेत. त्यांचा जन्म वडार समाजात झाला. जेऊर सारख्या छोट्या गावातून येऊन आपल्या लेखणी आणि दिग्दर्शन कौशल्याद्वारे मायानगरीत एक वेगळे अस्तित्त्व निर्माण करणारा कवी. सुरुवातीला पोलीस हवालदार, सिक्युरिटी गार्ड, इस्त्रीवाला अशी कामे त्यांनी केली.

शिक्षण

त्यांचे लग्न झाले तेव्हा ते फक्त १९ वर्षांचे होते आणि १२वीत शिकत होते. वडार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी, तरीही नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मंजुळे यांनी मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल. केले. त्यानंतर नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला. आणि तिथेच प्रोजेक्टचा एक भाग म्हणून 'पिस्तुल्या' ही पहिला लघुपट निर्माण केला.[]

कारकीर्द

मंजुळेच्या 'पिस्तुल्या' या पहिल्या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा तसेच कुटुंबाच्या गरिबीमुळे तसेच त्याच्या जमातीसाठी ह्या समाजात खोलवर रुजलेले द्वेष आणि तिरस्कार या कारणांमुळे मुलांना औपचारिक शिक्षण मिळण्यासाठीची असमर्थता हा लघुपट दर्शवितो. प्रथम चित्रपट फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. फॅंड्री म्हणजे कैकाडी भाषेतील डुक्कर.[] त्यांचा दुसरा चित्रपट 'सैराट' सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला.[][] त्यांचा 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा कवितासंग्रहही प्रकाशित आहे. []

खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, “नागराज मंजुळे हे २१व्या शतकातील सत्यजित राय आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देऊन जातात.”[ संदर्भ हवा ]

चित्रपट

  • पिस्तुल्या (लघुपट)
  • फॅंड्री (मराठी चित्रपट)
  • सैराट (मराठी चित्रपट) : या चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळ्यासाठी निवड झाली.[]
  • पावसाचा निबंध (मराठी लघुपट) : या लघुपटाला ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामद्धे सर्वोत्कृष्ट लघुपट हा पुरस्कार मिळाला.  []
  • नाळ (मराठी चित्रपट)
  • झुंड (हिंदी चित्रपट)
  • घर बंदूक बिरयानी (मराठी चित्रपट) []

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ https://www.deccanherald.com/content/163049/pistulya-depicts-deprivation-undying-urge.html
  2. ^ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/My-film-reflects-my-own-struggle-for-education/articleshow/8968010.cms
  3. ^ https://www.slashfilm.com/fandry-revisited/
  4. ^ https://www.ibtimes.co.in/box-office-collection-will-rinku-akash-starrer-marathi-film-sairat-cross-rs-100-crore-mark-679936
  5. ^ https://www.india.com/entertainment/sairat-box-office-marathi-blockbuster-on-its-way-to-rs-100-crore-collections-beating-baaghi-and-fan-1242159/
  6. ^ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/My-film-reflects-my-own-struggle-for-education/articleshow/8968010.cms
  7. ^ "६६वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळा" (इंग्रजी भाषेत). 2017-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-07 रोजी पाहिले.
  8. ^ author/online-lokmat (2018-04-13). "'कच्चा लिंबू' ते 'म्होरक्या'... राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीचा झेंडा; नागराज मंजुळेचा 'चौकार'". Lokmat. 2023-04-17 रोजी पाहिले.
  9. ^ "BLOG : घर-बंदुक-बिरयानी म्हणजे तुफानी मामला!". eSakal - Marathi Newspaper. 2023-04-17 रोजी पाहिले.
  10. ^ https://www.loksatta.com/pune-news/nagraj-manjule-get-bharat-ratna-dr-babasaheb-ambedkar-award-1490876/

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!