सारा डंबनेवाना (जन्म २६ मे १९९०) ही झिम्बाब्वेची क्रिकेट पंच आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. ती झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाकडून २००९ ते २०१४ दरम्यान खेळली, ज्यात २०११ विश्वचषक पात्रता सुद्धा समाविष्ट आहे. २०२२ मध्ये, तिला आयसीसी पंचांच्या विकास पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले. २०२४ महिला टी२० विश्वचषकात सामन्यांमध्ये आयसीसीने नामांकित केलेल्या महिला पंचांपैकी ती एक होती. आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणारी ती झिम्बाब्वेची पहिली महिला पंच बनली.