Share to: share facebook share twitter share wa share telegram print page

सप्तमी

सप्तमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावस्येनंतर ही साधारणपणे ७व्या दिवशी आली तर शुक्ल सप्तमी आणि पौर्णिमेनंतर सातव्या दिवशी आली तर कृष्ण सप्तमी असते.

काही विशेष सप्तम्या

  • चैत्र कृष्ण सप्तमी - गुरू अर्जुनदेव जयंती
  • वैशाख शुद्ध सप्तमी - गंगा सप्तमी, चित्रगुप्त जयंती (कायस्थ लोक मात्र, भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्त जयंती साजरी करतात.)
  • विवस्वत सप्तमी : आषाढ शुद्ध सप्तमी
  • आषाढ कृष्ण सप्तमी - शीतला सप्तमी (ओरिसा)
  • श्रावण शुद्ध सप्तमी - संत तुळशीदास जयंती. याच दिवशी इ.स. १४९७ साली तुळशीदासांचा जन्म झाला.
  • भाद्रपद शुक्ल सप्तमी - मुक्ताभरण सप्तमी, संतान सप्तमी
  • कार्तिक शुद्ध सप्तमी - सहस्रबाहू जयंती
  • मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी - गुरू घासीदास जयंती, नंदा सप्तमी
  • पौष शुक्ल सप्तमी - गुरू गोविंददास जयंती
  • पौष कृष्ण सप्तमी - रामानंदाचार्य जयंती
  • माघ शुद्ध सप्तमी - रथसप्तमी. अचला सप्तमी, विधान सप्तमी किंवा (रथ)आरोग्य सप्तमी; शिवाय चंद्रभागा सप्तमी (ओरिसा), नर्मदा जयंती
  • फाल्गुन कृष्ण सप्तमी - शीतला सप्तमी (ओरिसा सोडून अन्यत्र)
  • रविवारी येणारी सप्तमी - रविवार सप्तमी, भानुसप्तमी, सूर्य सप्तमी
  • शुक्ल पक्षात रविवारी येणारी सप्तमी - विजया सप्तमी
Prefix: a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9

Portal di Ensiklopedia Dunia

Kembali kehalaman sebelumnya