मराठी शाब्दबंधानुसार संदर्भ म्हणजे अशी स्थिती ज्यात एखादी घटना घडली[१] मराठी शाब्दबंधानुसार अवतरण उतारा म्हणजे अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश होय.[१]
संदर्भ नमुद करण्यासाठी ईंग्रजी भाषेत Citation हा शब्द वापरला जातो त्यास मराठी पारभाषिक शब्दकोशात 'उद्धरण', 'उल्लेख निर्देश', 'अवतरण', 'वाक्संहिता', 'प्रावाहन' हे शब्द सूचवले गेले आहेत.[२] विद्वत्तापूर्ण लेखनामध्ये चर्चा केलेल्या विषयाबद्दलच्या परिच्छेद अथवा ओळी पुढे इतर पुर्वासुरींच्या मांडणीचा वाङ्मयसूचीनुसारी सुसंबद्ध निर्देश उद्धृत केला जातो यास उद्धरणे म्हणतात. उद्धरणांमध्ये प्रकाशित अथवा अप्रकाशित स्रोताचा संदर्भ नमुद केला जाऊ शकतो. उद्धरणे ही मूळ स्रोतातूनच नमुद केली जातात असे नाही. सर्वसाधारणपणे संदर्भार्थ उद्धरण नमुद करावयाच्या परिच्छेद अथवा ओळी नंतर लगेचच संक्षिप्त वर्ण-संख्यानुसार (alphanumeric) अनुक्रमांक आंतर्भूत केला जातो, आणि लेखपान, लेख अथवा ग्रंथाच्या शेवटी या अनुक्रमांकापुढे संबंधीत संदर्भ कोणत्या लेख, ग्रंथ, व्याख्यान, बातमी, दस्तएवजातून घेतला गेला हे नमुद केले जाते.
सर्वसाधारणपणे परिच्छेदांतर्गत नमुद अनुक्रमीत संदर्भ उद्धरणे, आणि लेख/निबंध/ग्रंथाच्या शेवटी नमुद संदर्भ ग्रंथसूची मिळून लेख/ग्रंथाची संपूर्ण वाङ्मयसूची (bibliography) बनते. पुर्वासुरींच्या कल्पना आणि लेखनाचे श्रेय संदर्भ नेमक्या स्रोत ग्रंथ अथवा दस्तएवजाच्या नामनिर्देशासहीत नमुद करणे, लेखकाची वैचारिक मांडणी आणि दिलेले संदर्भ लेखनात केलेल्या दाव्यांनुसार, दिलेल्या स्रोतांशी जुळतात का ते स्वतंत्रपणे पडताळण्याची वाचकासाठी सोय करून, वाचकास लेखकाने वापरलेल्या स्रोतांची योग्यता आणि क्षमता तपासण्यास साहाय्यभूत ठरावे; लेखनाची एकात्मता आणि बौद्धिक प्रामाणिकता (intellectual honesty) जोपासली जावी , श्रेय न देता होणारी उचलेगिरी टाळली जावी अशा प्रकारची महत्त्वपूर्ण उद्दीश्ट्ये सुविहीत उद्धरणांच्या माध्यमातून साधली जातात.
स्वतःची मांडणी करताना इतर लेखकांच्या वापरलेल्या संकल्पना आणि लेखनाचे संदर्भांची जाणीवपूर्वक अभिस्वीकृती करण्यासाठी लागणाऱ्या true spirit[मराठी शब्द सुचवा] साठी गरजेच्या प्रत्येक परिच्छेद अथवा ओळीत वर्ण-संख्यानुसार अनुक्रमीत आणि सुसंबद्ध नसलेल्या, केवळ लेखाच्या/ग्रंथांच्या शेवटी संदर्भ अथवा ग्रंथसूची नमुद करण्यास स्विकार्य उद्धरण म्हणले जात नाही.[३]
विविध माध्यमातल्या संदर्भांबाबत उद्धरणे उद्धृत केली जाऊ शकतात जसे ऐतिहासिक दस्तएवज, हस्त लिखीते, पत्र व्यवहार, ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालीके, आंतरजाल यावरील लेख, निबंध, व्याख्याने, किंवा इतर दस्तएवज, उद्धृत केले जातात.
विज्ञान, कला, मानव्य शास्त्रे, कायदा अशा विविध क्षेत्रात उद्धरणे देण्याच्या विविध पद्धती आणि शैली रुढ आहेत.
एरीक एम. गुरेवीच् (Eric M Gurevitch) यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे ही संस्कृत साहित्यात बौद्धिक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.[४]
एरीक एम. गुरेवीच् यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे ही संस्कृत साहित्यात बौद्धिक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.
दहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला.
११व्या शतकातील काश्मिरी पंडित भिल्लणाने काव्यचोरीचा निषेध खालील श्लोकातून केला आहे.
१४ व्या शतकात पद्धती नावाच्या ग्रंथात सारंगधराने खालील श्लोकातून त्याचे मत प्रकट केले आहे
महानुभाव पंथीय गद्यपद्य स्मृतीस्थळ या ग्रंथात नरेन्द्रपण्डिताच्या रुक्मिणीस्वयंवर या ग्रंथाच्या संदर्भाने एक प्रसंग नमुद केला गेला आहे. नरेन्द्रपण्डिताचे रुक्मिणीस्वयंवर ऐकून रामदेवरायच्या मनात ते आपल्या नावावर असावे अशी अभिलाषा उत्पन्न झाली होती त्याबदल्यात प्रत्येक ओवीसाठी त्याने सुवर्णमुद्रा देऊ असे नरेन्द्रपंडितास सांगितले. पण इतर कवीलोक मला बोल लावतील असे म्हणत नरेन्द्राने त्यास नम्रपणे नकार दिला व् एकूणच प्रसंगांमुळे व्यथित होऊन देवगिरीच्या राज्यदरबारचा त्याग करून तो महानुभव पंथात सामील झाला.[५]
भारतीय प्रताधिकार कायद्याचे कलम ५७ उपकलम (१) खंड (a) अनुसार मूळ लेखकाचे श्रेय-संदर्भ (attribution) नमुद केले जाणे आवश्यक आहे
संदर्भ अवतरणांचा दर्जा आणि अचूकता ही विद्वतपूर्ण लेखन अभ्यासक/प्रकाशनां समोरील महत्त्वपूर्ण आव्हाने असतात.[६] शैक्षणिक लेखकांचे लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पनेवर केंद्रीत असते. परिणामी अनेक संदर्भ चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असते.संदर्भात उणीव जाणवल्यास अभ्यासू वाचक मूळ संदर्भांचा शोध घेतील असे प्रकाशकांनी गृहीत धरलेले असते.
भारतीय संशोधन जागतिक स्तरावर न दिसण्याची अनेक कारणे आहेत. काही अपवाद सोडता शास्त्रीय मांडणी करून लेखन करण्याबाबत भारतीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कमी पडतो.[७] केवळ जिथे अभ्यासकांचे प्रबंध मार्गदर्शक शास्त्रीय मांडणीबाबत आग्रही असतात तिथे हे कौशल्य विद्यार्थी आत्मसात करतात.[७] स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ.केशव देशमुख यांच्या मतानुसार, ज्ञानोपासनेत विश्लेषण हे संदर्भसंपन्न असणे महत्त्वपूर्ण असते आणि या बाबीचा मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांत अभाव दिसून येतो.[८]